भाजपा पदाधिकाऱ्याने पकडली पोलीस निरीक्षकाची कॉलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 04:23 IST2018-12-07T04:23:28+5:302018-12-07T04:23:30+5:30

वाहन अडविल्याचा राग आल्याने गुरुवारी सकाळी भाजपाच्या आजी- माजी शहराध्यक्षांनी बाजार समितीसमोर पोलीस निरीक्षकाची कॉलर पकडली.

The policeman arrested by the BJP office-bearer | भाजपा पदाधिकाऱ्याने पकडली पोलीस निरीक्षकाची कॉलर

भाजपा पदाधिकाऱ्याने पकडली पोलीस निरीक्षकाची कॉलर

जळगाव : वाहन अडविल्याचा राग आल्याने गुरुवारी सकाळी भाजपाच्या आजी- माजी शहराध्यक्षांनी बाजार समितीसमोर पोलीस निरीक्षकाची कॉलर पकडली. त्यामुळे संतापलेल्या पोलिसांनी या दोघा पदाधिकाºयांना बदडून काढले. याप्रकरणी एकूण तिघांना अटक करण्यात आली आहे. भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र साहेबराव पाटील, माजी शहराध्यक्ष अनिल उर्फ राजू चिरंजीलाल शर्मा आणि कार्यकर्ते मनिष पारीख अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Web Title: The policeman arrested by the BJP office-bearer