कॅटरिंग चालकाकांडून पोलिसांनी घेतली खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 12:44 PM2020-07-30T12:44:15+5:302020-07-30T12:44:24+5:30

जळगाव : लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचे कारण सांगून रामानंद नगर पोलीस स्टेशनचे विश्वनाथ गायकवाड व रवींद्र पाटील यांनी पाच हजार ...

Police take ransom from catering drivers | कॅटरिंग चालकाकांडून पोलिसांनी घेतली खंडणी

कॅटरिंग चालकाकांडून पोलिसांनी घेतली खंडणी

googlenewsNext

जळगाव : लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचे कारण सांगून रामानंद नगर पोलीस स्टेशनचे विश्वनाथ गायकवाड व रवींद्र पाटील यांनी पाच हजार रुपयांची खंडणी घेतल्याची तक्रार कॅटरिंगचा व्यवसाय करणारे सचिन अनिल सोनार (रा.विठ्ठल पेठ) यांनी बुधवारी पोलीस अधीक्षकांसह, विशेष पोलीस महानिरीक्षक व गृहमंत्र्यांकडे केली आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
तक्रारदार सचिन अनिल सोनार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, मोरया इव्हेंट्स या नावाने कॅटरिंगचा व्यवसाय करीत असून २५ जून २०२० रोजी क्रेझी होम हॉटेलमध्ये दोन वेगवेगळ्या मजल्यावर दोन विवास्थळांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याची आॅर्डर सचिन अनिल सोनार यांना मिळाली होती. त्यासाठी त्यांनी व हॉटेल मालक चंद्रशेखर अग्रवाल यांनी रामानंद नगर पोलिसांची रितसर परवानगी घेतली होती. २५ रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास रामानंदनगरचे कर्मचारी विश्वनाथ गायकवाड आणि रवी पाटील यांनी विवाहसोहळ्याच्या ठिकाणी येऊन दम दिला होता.

Web Title: Police take ransom from catering drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.