विनापरवाना मांस विक्री करणाऱ्या ९ जणांवर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:14 IST2021-04-26T04:14:09+5:302021-04-26T04:14:09+5:30
जळगाव : भगवान महावीर जयंतीनिमित्त मांस विक्रीला बंदी असताना दुकाने उघडी ठेवून मांस विक्री सुरु ठेवल्याबद्दल जिल्हा पेठ पोलिसांनी ...

विनापरवाना मांस विक्री करणाऱ्या ९ जणांवर पोलिसांची कारवाई
जळगाव : भगवान महावीर जयंतीनिमित्त मांस विक्रीला बंदी असताना दुकाने उघडी ठेवून मांस विक्री सुरु ठेवल्याबद्दल जिल्हा पेठ पोलिसांनी भास्कर मार्केट परिसरात नऊ विक्रेत्यांवर रविवारी प्रत्येकी २ हजार रूपयांची दंडात्मक कारवाई केली.
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही कारवाईची मोहीम राबविण्यात आली. एकूण नऊ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यात अपना चिकन दुकानाचे मालक इमरान सजाद खाटीक, ए वन चिकन सेंटरचे अजिज खाटीक, अमोल चिकन दुकानाचे शेख खलील शेख याकुब, भवानी चिकन दुकानाचे गोपाल दगडू राऊळकर, हसनियन चिकन दुकानाचे ईश्वर दगडू राऊळकर, अलिशा चिकन दुकानाचे बाबू उस्मान खाटीक, सातपुडा चिकन दुकानाचा मालक सईद दादामिया खाटीक, दंगलग्रस्त कॉलनीतील मटन विक्रेता असिफ अजिज खाटीक आणि जाकीर असलम खाटीक अशा ९ जणांवर जिल्हा पेठ पोलिसांनी प्रत्येकी २ हजार रूपयांची दंडात्मक कारवाई केली.