चोपडा, जि.जळगाव : येथील शहर पोलीस ठाण्यात सेवारत व रिद्धीसिद्धी कॉलनीमध्ये भाड्याच्या घरात रहिवास करणारे पंकज मोहन पाटील (वय २८) यांनी कौटुंबिक कारणावरून दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. २० रोजी सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.पोलीस सूत्रांनुसार, या पोलिसाची कौटुंबिक स्थिती ठीक नव्हती. यापूर्वी घरात भांडणं होत असल्याने त्यांची पत्नी सोडून माहेरी निघून गेली होती. म्हणून नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले आहे.सदर पोलीस मूळ गाढोदा, ता.जळगाव येथील रहिवासी आहे. शवविच्छेदन येथील उपजिल्हा रुग्णालयात झाले आणि त्यांचे शेव अंत्ययात्रेसाठी गाढोदा येथे नेण्यात आले. अंत्यसंस्कार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज पाटील यांच्या खबरीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर जवागे करीत आहे.
चोपडा येथे पोलिसाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 18:44 IST
शहर पोलीस ठाण्यात सेवारत पंकज मोहन पाटील यांनी आत्महत्या केली.
चोपडा येथे पोलिसाची आत्महत्या
ठळक मुद्देकौटुंबिक कारणातून घेतला गळफासपत्नी सोडून माहेरी निघून गेली होती