धरणगावात गावठी दारू विक्रीचे शेड पोलिसांनी केले भस्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 21:21 IST2020-03-30T21:20:03+5:302020-03-30T21:21:08+5:30
संजय नगर भागात एका शेडमध्ये अवैध, गावठी दारू विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी चोप दिला व शेड जाळून नष्ट केले.

धरणगावात गावठी दारू विक्रीचे शेड पोलिसांनी केले भस्म
ठळक मुद्देदारू विक्रेत्यास दिला चोप३५ लीटर दारू केली नष्ट
धरणगाव, जि.जळगाव : येथील संजय नगर भागात एका शेडमध्ये अवैध, गावठी दारू विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी चोप दिला व शेड जाळून नष्ट केले.
संजय नगर भागातील घराच्या आडोशाला असलेल्या या शेडमध्ये ही गावठी दारू विक्री होत होती. पोलिसांनी ३५ लीटर गावठी दारू नष्ट केली. विक्रेत्याचे शेड जाळले. ही कारवाई सपोनि पवन देसले,पो.काँ. संजय सूर्यवंशी, पो.काँ. वसंत कोळी, पो.काँ. श्यामराव भिल यांनी केली. तीन आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.