प्रतिबंधित विदेशी मद्याचा साठा पोलिसांनी पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:16 IST2021-02-07T04:16:02+5:302021-02-07T04:16:02+5:30

जळगाव : चोपडा तालुक्यातील गलांगी फाट्याजवळ महाराष्ट्रात विक्रीसाठी बंद असलेला हजारो रुपयांचा विदेशी मद्याचा साठा शुक्रवारी जळगाव राज्य उत्पादन ...

Police seized stocks of banned foreign liquor | प्रतिबंधित विदेशी मद्याचा साठा पोलिसांनी पकडला

प्रतिबंधित विदेशी मद्याचा साठा पोलिसांनी पकडला

जळगाव : चोपडा तालुक्यातील गलांगी फाट्याजवळ महाराष्ट्रात विक्रीसाठी बंद असलेला हजारो रुपयांचा विदेशी मद्याचा साठा शुक्रवारी जळगाव राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने जप्त केला. या कारवाईमध्ये योगेश शिवाजी ठाकूर (३६) व चेतन राजेंद्र आखाडे (२४, दोन्ही रा. शिरपूर, जि.धुळे) यांना अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेला विदेशी मद्याचा साठा घेऊन दोन व्यक्ती चोपडा तालुक्यातील गलांगी फाट्याकडे दुचाकीने येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाला मिळाली होती. अधीक्षक सीमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक एस.एफ. ठेंगडे, ए.एस.पाटील, एम.डी.पाटील, एन.पी.पाटील, के.पी.सोनवणे, ए.व्ही.गावंडे, एस.ए.माने, ए.आर. बिजुले यांनी गलांगी फाटा गाठला़ नंतर दुचाकीवरून दोघे येत असताना त्यांना पकडून तपासणी केली असता, त्यांच्याकडे विदेशी मद्याचा साठा आढळून आला. त्यांची चौकशी केली असता योगेश शिवाजी ठाकूर व चेतन राजेंद्र आखाडे असे त्यांचे नाव सांगितले. त्यांच्याजवळून पोलिसांनी मद्याचा साठा तसेच तीन मोबाइल व एक दुचाकी असा एकूण ९७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title: Police seized stocks of banned foreign liquor