शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

पोलिसावर रिक्षाचालकाचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 12:47 AM

आरोपीने स्वत:च्या हातावर केला वार : फैजपुरात रिक्षाचालकाची मुजोरी

फैजपूर, जि.जळगाव : फैजपूर (ता.यावल) येथील बसस्थानकाबाहेर रिक्षा चालकाला पोलिसांनी रिक्षा बाजूला लावण्याचे सांगितल्याने रिक्षाचालकाने पोलिसांवर हल्ला करत त्यांना मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता घडली. पोलिसाला मारहाण केल्यानंतर उलट रिक्षाचालकाने स्वत:च्या हातावर कटरने वार करत जखमी करून घेतले. या घटनेने खळबळ उडाली.खाकीवरच हल्ला होत असताना सामान्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. यात फिर्यादी कॉन्स्टेबल महेंद्र महाजन यांच्यावर हल्ला करणारा आरोपी रिक्षाचालक शाहरुख शेख करीम याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसस्थानकासमोर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा उभ्या असताना शनिवारी सकाळी ११ वाजता शाहरुख शेख करीम याला सुधाकर महाजन व कॉन्स्टेबल उमेश सानप यांनी रिक्षा बाजूला लावण्याचे सांगितले. याचा राग आल्याने शाहरुख याने रिक्षाच्या सिटवर बसून रिक्षाच्या समोरील काच लाथ मारून फोडली. त्यानंतर पोलीस महाजन यांच्यावर फायटरने हल्ला चढविला. त्यामुळे महाजन यांच्या उजव्या बरगडीला गंभीर दुखापत झाली. याप्रसंगी बसस्थानकाबाहेर मोठा जमाव झाला होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच फौजदार जिजाबराव पाटील व सहकारी घटनास्थळी धावले. जमाव पांगविला. पोलिसांनी शाहरुख याला तुझ्या विरुद्ध कारवाई करू, असे सांगितले. तेव्हा त्याने स्वत:च्या उजव्या हातावर धारदार कटरने वार करून जखमी करून घेतले व सेवा बजावत असलेल्या पोलिसांना मी तुमच्याविरुद्ध खोटी तक्रार करून तुम्हाला पोलीस खात्यातून निलंबित करायला लावेल, अशी धमकी दिली. सुधाकर महाजन यांच्या फिर्यादीवरून शाहरुख याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३३२, ३३३,५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सपोनि दत्तात्रय निकम, जिजाबराव पाटील करीत आहे. डीवायएसपी राजेंद्र रायसिंग, दत्तात्रय निकम यांनी घटनेची माहिती घेतली. त्यांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांची कुंडली जमा करणे सुरू केले आहे. त्यांच्यावर हद्दपारी व मोक्कासारखी कारवाई करण्याचे प्रस्ताव पाठवले जातील, असे सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFaizpurफैजपूर