जळगाव येथे ११२ जागांसाठी सोमवारपासून पोलीस भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:30 IST2018-03-11T22:30:21+5:302018-03-11T22:30:21+5:30
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या रिक्त असलेल्या ११२ जागांसाठी जळगावात सोमवारपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी १६ हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यात दोन हजार २०० महिलांचा समावेश आहे. भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक होणार असून गैरप्रकार करणाºयांवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे.

जळगाव येथे ११२ जागांसाठी सोमवारपासून पोलीस भरती
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,११ : जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या रिक्त असलेल्या ११२ जागांसाठी जळगावात सोमवारपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी १६ हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यात दोन हजार २०० महिलांचा समावेश आहे. भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक होणार असून गैरप्रकार करणाºयांवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे.
सीसीटीव्ही कॅमे-याची नजर
पोलीस भरती प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमे-याच्या निगराणीत होणार आहे. त्यासाठी मैदानावर प्रत्येक चाचणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मध्यभागी स्वत: पोलीस अधीक्षक यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून ते निरीक्षण करणार आहेत.महिला बाल कल्याण विभाग, आदीवासी कल्याण विभाग व जिल्हा सैनिक बोर्ड यांचेही या भरतीत सहकार्य घेतले जात आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गुप्त वार्ता व गुन्हे शाखेच्या पथकाची नजर असणार आहे.
- ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. गैरप्रकार आढळून आल्यास उमेदवार व संबंधितांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात येतील.
-दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक