दोन महिलांच्या दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:11 IST2021-07-03T04:11:50+5:302021-07-03T04:11:50+5:30
सांगवी येथे बाजारपेठेजवळ आक्काबाई सुरेश चव्हाण या गैरकायदा गावठी तयार दारूची चोरटी करीत असल्याची माहिती मिळताच, पोलिसांच्या छापा टाकला. ...

दोन महिलांच्या दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड
सांगवी येथे बाजारपेठेजवळ आक्काबाई सुरेश चव्हाण या गैरकायदा गावठी तयार दारूची चोरटी करीत असल्याची माहिती मिळताच, पोलिसांच्या छापा टाकला. त्यात ८१ हजार ३८० रुपयांच्या गावठी दारूसह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. यानंतर जवळच असलेल्या कमलाबाई रामा राठोड यांच्या अड्ड्याकडे पोलिसांनी मोर्चा वळविला. यात ५१ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. पोलीस पथक अड्ड्यावर येत असल्याचा सुगावा लागताच, अंधाराचा फायदा घेत आक्काबाई चव्हाण व कमलाबाई राठोड या दोघीही तेथून फरार झाल्या. तिसऱ्या धाडीत अनिल वसंत राठोड यांच्या दारू अड्ड्यावरून पोलिसांनी ७२ हजार ९५० रुपयांच्या दारूसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. पहिल्या व दुसऱ्या घटनेत महिला पोलीस कर्मचारी मालती बच्छाव यांच्या फिर्यादीवरून तर तिसऱ्या घटनेत पोकॉ. रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून वरील तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारू अधिनियम १९४९ अंतर्गत ६५ ई व ६५ एफनुसार कारवाई करण्यात आली आहे. या पथकातील पोना. प्रशांत पाटील, नंदकिशोर निकम, संदीप माने, अमोल चौधरी, रवींद्र पाटील, तुकाराम चौधरी यांनी ही कारवाई केली.