चाळीसगाव येथे सोशल क्लबवर पोलिसांची छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:11 IST2019-01-26T00:10:52+5:302019-01-26T00:11:04+5:30
२४ जणांना अटक व सुटका

चाळीसगाव येथे सोशल क्लबवर पोलिसांची छापा
चाळीसगाव : नारायणवाडीतील एका पेट्रोलपंपसमोरील दुमजली इमारतीत चालणाऱ्या तिरुपती बालाजी क्रीडा मंडळ या सोशल क्लबवर २४ रोजी रात्री पोलिसांनी छापा टाकून २४ जणांना अटक करुन ८१ हजार ३० रुपयाचा ऐवज पोलिसांनी केला. अटक केलेल्यांना जामिनावर सोडण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारायणवाडीतील एका पेट्रोलपंपसमोरील दुमजली इमारतीतील तिरुपती बालाजी क्रीडा मंडळ या सोशल क्लबमध्ये पैसे लावून जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २४ रोजी रात्री अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव व पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या पथकाने छापा टाकला.
या छाप्यात ४७ हजार ३८० रुपये रोख व ३३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल असा एकूण ८१ हजार ३० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी पोलीस हे.कॉ. बापुराव भोसले यांच्या फिर्यादीवरुन क्लब चालक रवींद्र पोळ, शेख शकील, युवराज पाटील, भास्कर पाथरवर, ज्ञानदेव पाटील, शेख अजीत, युवराज पाटील, सुदाम चौधरी, मेहमुद खान, लालेखा चांदखा पठाण, अनिल पवार, सुदाम पवार, विनोद देशमुख, सैय्यद शफी, उन्मेष जाधव, इम्तीयाज अकील शकील, संदिप शिंपी, उस्मान अ.करीम, वाल्मीक मगर, तुळशीराम साळुंखे, संजय पगारे यांच्यासह २४ जणांविरुध्द भा.दं.वि.कलम ४२०, मु.पो.अॅक्ट ४, ५ अन्वये कारवाई करण्यात आली. सर्वांना अटक करण्यात येऊन जामिनावर सोडले.