गावठी दारुच्या अड्ड्यावर पोलिसांच्या धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 21:20 IST2019-12-31T21:19:41+5:302019-12-31T21:20:55+5:30

जळगाव : शहर व शनी पेठ पोलिसांनी मंगळवारी सकाळी गावठी दारुच्या अड्ड्यावर छापे टाकले. त्यात दोन जणांना ताब्यात घेण्यात ...

Police raid at Gawadi liquor station | गावठी दारुच्या अड्ड्यावर पोलिसांच्या धाडी

गावठी दारुच्या अड्ड्यावर पोलिसांच्या धाडी

जळगाव : शहर व शनी पेठ पोलिसांनी मंगळवारी सकाळी गावठी दारुच्या अड्ड्यावर छापे टाकले. त्यात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून १ हजार ६०० रुपये किमतीची गावठी दारु जप्त करण्यात आली आहे.
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण निकम यांच्या पथकातील सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, विजय निकुंभ, सचिन वाघ, गणेश शिरसाळे, भास्कर ठाकरे, वैशाली पावरा, रतन गीते, दिलीप पाटील यांनी गेंदालाल मिल भागात घराच्या भिंतीच्या आडोश्याला गावठी दारु विक्री करणाऱ्या वंदना अहिरे या महिलेस ताब्यात घेतले. तिच्याकडून ८०० रुपये किमतीची गावठी दारु जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेक्सोमाता नगरात कारवाई
शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या पथकातील दिनेशसिंग पाटील, हकीम शेख, किरण वानखेडे, रविंद्र पवार, संजय शेलार, अमोल विसपुते यांनी मेक्सोमाता नगरात गावठी दारु विक्री करणाºया शांताराम पुंडलिक महाले (५०) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८०० रुपयांची १५ लीटर गावठी दारु हस्तगत करण्यात आली.

Web Title: Police raid at Gawadi liquor station

टॅग्स :Jalgaonजळगाव