रावेर : श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी शहरात पथसंचलन केले.
रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक व शीघ्र कृतिदलाचे उपसमादेशक शशिकांत राय यांच्या नेतृत्वाखाली शीघ्र कृती दलाची सशस्त्र तुकडी, राज्य राखीव दलाची सशस्त्र तुकडी, दंगा नियंत्रण पथकाची तुकडी, मलकापूर वाहतूक शाखेची सुरक्षा तुकडी व रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस दल तथा गृहरक्षक दलाच्या तुकडीच्या बलशाली जवानांनी संवेदनशील भागातून पथसंचलन करीत पोलीस दल सज्ज असल्याचे दर्शन घडवले.
रावेर शहराचे महत्त्वाचे संवेदनशील भागाची संमिश्र वस्ती व जास्तीत जास्त गणपती स्थापना झालेल्या भागाबाबत पथसंचलनाचे महत्त्व समजावून सांगत पोलीस स्टेशनपासून पथसंचलन आशय आरंभ करण्यात आला.
शहरातील संवेदनशील भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बऱ्हाणपूर जिलेबी सेंटर, पंचशील चौक, संभाजीनगर पूल, बंडू चौक, रमेश मराठे यांचे घर, बंडू चौक, संभाजीनगर पूल, कोतवाल वाडा मशीद, थडा भाग, जतेशा बाबा दर्गा, नागझिरी मशीद, म.फुले चौक, स्वामी विवेकानंद चौक, रामास्वामी मठ, पाराचा गणपती, मन्यार वाडा, मशीद, शिवाजी चौक, मंगरूळ दरवाजा, कारागीर नगर, मुस्कान पान सेंटर, भोईवाडा मशीद, गांधी चौक, चोराहा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गाने पथसंचलन केले.