मोंढाळे येथील पोलीस पाटील निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 21:41 IST2019-09-24T21:14:04+5:302019-09-24T21:41:58+5:30
एरंडोल : बोरी नदीवरील तामसवाडी धरणातून ६ सप्टेंबर रोजी पाण्याचा विसर्ग करण्यात येत असताना मोंढाळे प्र.उ. येथील पोलीस पाटील ...

मोंढाळे येथील पोलीस पाटील निलंबित
एरंडोल : बोरी नदीवरील तामसवाडी धरणातून ६ सप्टेंबर रोजी पाण्याचा विसर्ग करण्यात येत असताना मोंढाळे प्र.उ. येथील पोलीस पाटील कांतीलाल भिवसन पाटील यांना नदी काठावर थांबवण्याबाबत सूचना दिली होती. परंतु प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी प्रत्यक्ष सदर गावाला भेट दिली असता त्या ठिकाणी कांतीलाल पाटील हजर नव्हते.
त्यांनी नैसर्गिक आपत्तीच्या बचावकार्यात सहकायार्ची भूूमिका न ठेवल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.