शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमीयुगुलांना ब्लॅकमेल करणाऱ्या दोन तोतया पोलिसांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:56 IST

जळगाव : पोलीस असल्याची बतावणी करुन मेहरुण चौपाटीवर प्रेमीयुगुलांना ब्लॅकमेल करणाºया पवन रमेश काळे (२३, रा.तरसोद ता. जळगाव ) ...

जळगाव : पोलीस असल्याची बतावणी करुन मेहरुण चौपाटीवर प्रेमीयुगुलांना ब्लॅकमेल करणाºया पवन रमेश काळे (२३, रा.तरसोद ता. जळगाव) व रवींद्र भागवत चौधरी (२३, रा.भादली ता.जळगाव) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.मेहरुण तलावाच्या परिसरात फिरायला आलेल्या तरुण-तरुणी तसेच प्रेमीयुगुलांना मंगळवारी दुपारी काही तरुण पोलीस असल्याचे सांगून ब्लॅकमेक करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांना मिळाली होती.या तरुणांनी पोलिसांचा कमांडो गणवेश परिधान करुन कमरेला एका पिस्तुल लावलेला होता. त्याशिवाय पोलिसाचे लॉकेट व फायबरचा दांडा असल्याने ते पोलीस आहेत किंवा नाही याबाबत शंका होती, त्यामुळे शिरसाठ यांनी सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, जितेंद्र राजपुत, सचिन पाटील व मुकेश पाटील यांचे पथक तलावाकडे रवाना केले. हे पथक पोहचण्याच्या आधी सचिन चौधरी या कर्मचाºयाने रवींद्र भागवत चौधरी याला पकडून ठेवले होते. तितक्यात पोलिसांचे पथक तेथे धडकले.चौधरी याला दुचाकी व बनावट पिस्तुलसह पकडण्यात आले. दुसरा साथीदार पवन काळे याला अजिंठा चौक परिसरात पकडण्यात आले.रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.तरुणांच्या खिशाची झडती घेतलीया तोतया पोलिसांनी प्रेमीयुगुलांना धाकात घेतल्यानंतर पुढे तलावाच्या काठी गौरव राजेंद्र पवार (रा.चंदु अण्णा नगर, जळगाव) हा त्याच्या मित्रांसह बसलेला असतांना ‘त्यांना तुम्ही इथे काय करता आहे. तुमची झडती घ्यायची आहे’ असे म्हणून खिसे चाचपडत होता.याचवेळी सचिन चौधरी या पोलिसाने तेथे येवून रवींद्र चौधरी याला पकडले.त्याच्याकडे पोलिसाचे ओळखपत्र मागितले असता तो गोंधळात पडला तर दुसरा साथीदार फरार झाला होता.- पोलीस कर्मचारी सचिन चौधरी यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाधिकारी आनंदसिंग पाटील यांनी बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्या.अक्षी जैन यांनी दोघं संशयितांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव