लोंढ्रीतांड्यातील विषबाधित पशुधन धोक्यात : १७ जनावरे दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 04:50 PM2019-12-08T16:50:58+5:302019-12-08T16:52:26+5:30

लोंढ्रीतांडा, ता.जामनेर येथे प्राथमिक अंदाजानुसार चाऱ्यातून विषबाधेने शनिवारी चार जनावरे दगावली. यानंतर उपचार सुरू झाले आहे. रात्र उलटत नाही तोच रविवारी पहाटेपासून पुन्हा १७ जनावरे मृत्यमुखी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे संपूर्ण तांड्यातील पशुधन धोक्यात आले असून मृृत जनावरांची संख्या वाढण्याची भीती आहे.

Poisonous livestock in danger from Londrita | लोंढ्रीतांड्यातील विषबाधित पशुधन धोक्यात : १७ जनावरे दगावली

लोंढ्रीतांड्यातील विषबाधित पशुधन धोक्यात : १७ जनावरे दगावली

Next
ठळक मुद्दे८० जनावरे बाधिततहसीलदारांकडून पंचनाम्याचे आदेशपशुवैद्यकीय अधिकारी तळ ठोकून

मनोज जोशी ।
पहूर, ता.जामनेर : लोंढ्रीतांडा, ता.जामनेर येथे प्राथमिक अंदाजानुसार चाऱ्यातून विषबाधेने शनिवारी चार जनावरे दगावली. यानंतर उपचार सुरू झाले आहे. रात्र उलटत नाही तोच रविवारी पहाटेपासून पुन्हा १७ जनावरे मृत्यमुखी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे संपूर्ण तांड्यातील पशुधन धोक्यात आले असून मृृत जनावरांची संख्या वाढण्याची भीती आहे. तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी तळ ठोकून आहे. या घटनेच्या पंचनाम्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहे, तर संबंधित शेतीच्या मालकाने विष बाधेसंर्दभात प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने मृत जनावरांच्या निदानाचे आव्हान पशुवैद्यकीय अधिकाºयांसमोर निर्माण झाले आहे.
पहूरपासून पाच किलोमीटर अंतरावरील लोंढ्री गावात तांडा वसाहत आहे. तांड्यातील सत्तर ते ऐंशी लहान मोठे जनावरांचा कळप शुक्रवारी दुपारी तांड्यापासून काही अंतरावर अशोक जयवंत काकडे यांच्या शेतात गुराख्याने जनावरे चारून संध्याकाळी गावात परत आणली.
जनावरे शनिवारी बाधित उघड
शनिवारी जनावरे तोंडातून फेस व फुगून येत असल्याचे शेतकºयांना निदर्शनास आले. उपचारापूर्वी शनिवार दुपारपर्यंत चार जनावरे दगावल्याने शेतकरी भयभीत झाले. याची कल्पना पशुवैद्यकीय अधिकाºयांना देण्यात आली. त्यानुसार तालुका पशुवैद्यकीय विकास अधिकारी डॉ.एस.एच.व्यवहारे पथकासह तांड्यात दाखल होऊन तत्काळ बाधित जनावरांवर उशिरापर्यंत उपचार सुरू केले
उपचारानंतर १७ जनावरे दगावली
तांड्यातील सुरेश राघो चव्हाण यांची १४ मोठी जनावरे बाधित झाली. या जनावरांवर शनिवारी रात्रीपासून उपचार सुरू आहे. पैकी दोन बैल व तीन गाय रविवारी दगावली असून नऊ जनावरे गंभीर आहेत. लालसिंग कन्हेराम चव्हाण यांची एक गाय, एक बैल मृत, तर दोन गंभीर, दीपक हंसराज चव्हाण यांची बैल जोडी, भुरालाल मोहनदास राठोड यांची एक म्हैस, एक बैल, मल्लू जयसिंग राठोड यांच्या दोन शेळ्या, हिवरसिंग गुलाब राठोड यांची एक बैलजोडी, बळीराम रामसिंग राठोड यांचा एक बैल, साईदास गबरू राठोड यांचा एक बैल मरण पावला आहे.प् १५ मोठी जनावरे व दोन शेळ्यांचा समावेश असून आतापर्यंत एकवीस जनावरे दगावली आहे. मात्र तांड्यातील चाळीस ते पन्नास जनावरे बाधित आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून यापैकी काही जनावरे मृत्यूूशी झुंज देत असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. यात तांड्यातील प्रत्येक शेतकºयांची दोन ते तीन जनावरांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.
पंचनाम्याचे आदेश
तहसीलदार अरूण शेवाळे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली आहे. याचबरोबर मृत जनावरांचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी स्वाती बांगर, ग्रामसेवक शीतल पाटील यांना दिले आहे. त्यानुसार पंचनामे सुरूआहे.
पशुवैद्यकीय अधिकारी ठाण मांडून
तालुका पशुवैद्यकीय विकास अधिकारी डॉ.एस.एच.व्यवहारे, डॉ.डी.एच.पाटील, डॉ.जयलाल राठोड, डॉ.आर.आर.ठाकूर, डॉ.स्वप्नजा लोखंडे, डॉ.चंद्रकांत आव्हाड या पशुवैद्यकीय अधिकाºयांचे पथक उपचारासाठी ठाण मांडून आहे. मृुत जनावरांचे शवविच्छेदन करून त्यांच्या अवयवांचे नमुने फाँरेंसिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार चाºयातून विषबाधेने जनावरे दगावत असल्याचे या डॉक्टरांनी सांगितले. मात्र प्रमुख निदान शवविच्छेदनाच्या अहवालातून समोर येईल, असेही सांगितले आहे.
जनावरांच्या मृत्यूचे निदान प्रश्नांकित
तांड्यातील जनावरांना डॉक्टरांच्या प्राथमिक अंदाजानुसार, जनावरे चाºयातून विषबाधा झाल्याचे सांगितले आहे, तर शेतीमालक अशोक काकडे यांनी माझे व गावातील काही शेतकºयांची गुरे याचठिकाणी चरली आहेत. त्यांना काहीही झाले नाही. त्यामुळे काकडेंनी विषबाधेच्या कारणाविषयी साशंकता निर्माण केली. उपचारानंतरही बाधित जनावरे नियंत्रणात येत नाहीे. उपचाराला बाधित जनावरे प्रतिसाद देत नाही. त्यामुळे जनावरांच्या मृत्यूचे निदान पशुवैद्यकीय अधिकाºयांसाठी आव्हान ठरले आहे.
घटनास्थळी धाव
माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांचे स्वीय साहाय्यक संतोष बारी, सभापती निता पाटील, पाळधीचे माजी सरपंच कमलाकर पाटील, सेवानिवृत्त अभियंता जे.के.चव्हाण, लोंढ्री येथील माजी सरपंच राजमल भागवत, पोलीस पाटील डॉ. सुभाष चिकटे यांच्यासह पदाधिकाºयांनी पाहणी केली आहे.

मृत जनावरांच्या मृत्यूची कारण वेगळी
संबंधित शेतीमालक माझ्या शेतात कपाशी पीक होते. १५ दिवसांपासून माझे स्वत:चे गुरे तसेच लोंढ्री बुद्रूक व खुर्द गावातील काही शेतकºयांची गुरे कपाशीत चरली आहेत. त्यांना काहीही झाले नाही. शुक्रवारी कपाशी पिक उपटून काढले आहे. त्याच ठिकाणी या गुरांचा कळप चरलो आहे. मात्र या जनावरांच्या मृत्यूचे कारण वेगळे असू शकते.
-अशोक जयवंत काकडे, शेतीमालक लोंढ्री बुद्रूक, ता.जामनेर

शुक्रवारी जंगलात माझी १४ जनावरे चरण्यासाठी गेली. पैकी पाच जनावरे दगावली आहे. नऊ जनावरे गंभीर आहेत. रविवारी सकाळी डॉक्टरांना फोन केल्यावर डॉक्टर ११ वाजता घटनास्थळी उशिरा दाखल झाले.
-सुरेश राघो चव्हाण, शेतकरी पशुधन नुकसानग्रस्त, लोंढ्री ताडा, ता.जामनेर


दोन गायी शुक्रवारी चरून घरी आल्या. शनिवारी सकाळपासून गायी फुगून तोंडातून फेस आला व मरण पावल्या. डॉक्टरांना दुपारी दोन वाजता माहिती दिली. डॉक्टर दुपारी चार वाजता तांड्यात दाखल झाले.
-छोटू रामदास चव्हाण, लोंढ्री तांडा

तांड्याातील शेतकºयांची लहान मोठी अशी ७० ते ८० जनावरे कपाशी उपटलेल्या शेतात शुक्रवारी दुपारी चारली. नंतर सायंकाळी तांड्यात कळप आणल्यावर गुरांना काहीही झाल्याचे दिसून आले नाही. शनिवारी जनावरे मरण पावली. घायाळ झाली आहे.
-बंडू अमरू राठोड, गुराखी, लोंढ्री तांडा


संबंधित शेतकºयांच्या दगावलेल्या जनावरांचे पंचनामे करून जिल्हाधिकाºयांकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे. मदतीसाठी जिल्हाधिकाºयांच्या पातळीवरून निर्णय घेण्यात येईल.
-अरूण शेवाळे, तहसीलदार, जामनेर

प्राथमिक अंदाजानुसार जनावरांना चाºयातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत जनावरांचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांच्या अवयवांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. शवविच्छेदनाच्या अहवालातून प्रमुख निदान निष्पन्न होईल. बाधित जनावरांच्या उपचारासाठी पथक तैनात आहे. उपचार सुरू आहे.
-डॉ.एस.एच.व्यवहारे, तालुका पशुवैद्यकीय विकास अधिकारी, जामनेर

 

Web Title: Poisonous livestock in danger from Londrita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी