भोरटेक येथील शेतकऱ्याचा विषबाधेने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 17:03 IST2019-09-25T17:03:05+5:302019-09-25T17:03:10+5:30
अमळनेर : तालुक्यातील भोरटेक येथील सुपडू नंदा कढरे (वय ६०) या शेतकºयाला शेतात फवारणी करताना विषबाधा झाली होती. त्यांचा ...

भोरटेक येथील शेतकऱ्याचा विषबाधेने मृत्यू
अमळनेर : तालुक्यातील भोरटेक येथील सुपडू नंदा कढरे (वय ६०) या शेतकºयाला शेतात फवारणी करताना विषबाधा झाली होती. त्यांचा धुळे येथे जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सुपडू कढरे हे मंगळवारी शेतात कापसावर कीडनाशकांची फवारणी करण्यासाठी गेले होते. त्यांना विषबाधा झाल्याने मळमळ व उलट्या होऊ लागल्या. ही बाब निदर्शनास येताच त्यांच्यासमवेत काम करीत असलेल्या शिवदास मंगा कढरे यांनी कुटुंबीय व ग्रामस्थांच्या मदतीने सुपडू यांना तत्काळ उपचारार्थ अमळनेर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.