पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाकडे आढळले पिस्तूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:22 IST2021-08-18T04:22:38+5:302021-08-18T04:22:38+5:30

चिंचोली गावातील एका तरुणाकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेचे किरण बकाले यांना मिळाली होती. त्याची ...

A pistol was found in the possession of a young man who was preparing for police recruitment | पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाकडे आढळले पिस्तूल

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाकडे आढळले पिस्तूल

चिंचोली गावातील एका तरुणाकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेचे किरण बकाले यांना मिळाली होती. त्याची पडताळणी करण्यासाठी बकाले यांनी हवालदार शरद भालेराव व किरण चौधरी यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. गणेश याच्याकडे पिस्तूल असल्याची खात्री झाल्यानंतर सहायक फौजदार अशोक महाजन, शरद भालेराव, महेश महाजन, किरण चौधरी, दत्तात्रय बडगुजर, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, अभिलाषा मनोरे व भारत पाटील यांच्या पथकाने सोमवारी रात्री पाळत ठेवून गणेशच्या घरात जाऊन झडती घेतली असता पलंगावरील गादीखाली लपविलेले पिस्तूल आढळून आले. हे पिस्तूल आपल्याला सापडले आहे, असे तो सांगत असला तरी पोलीस त्याची चौकशी करीत आहेत. गणेश हा पोलीस भरतीची तयारी करीत असून मैदानी चाचणीतील अनेक बाबी त्याने पूर्ण केलेल्या आहेत. आता या प्रकरणात त्याचे स्वप्न भंगले आहे.

इन्फो...

महासंचालकांचे आदेश अन‌् पहिलीच कारवाई

बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध १५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यात कारवाईची मोहीम राबविण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिलेले आहेत. त्याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके (कायदा व सुव्यवस्था) यांच्या स्वाक्षरीचे परिपत्रक पोलीस अधीक्षकांना प्राप्त झालेले आहे. या आदेशानुसार परिक्षेत्रात पहिलीच कारवाई एलसीबीने केली आहे. मागील दहा वर्षांच्या रेकॉर्डवरील शस्त्र पुरविणारे, बाळगणारे यांची सखोल चौकशी करून ते पुन्हा सक्रिय झालेले असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

Web Title: A pistol was found in the possession of a young man who was preparing for police recruitment