शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

राज्यभर कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंडअळीचा उच्छाद

By ram.jadhav | Published: December 25, 2017 7:44 PM

नियंत्रण मिळविण्यासाठी जिवनचक्र समजून घेणे गरजेचे

ठळक मुद्देगुणवत्ता ढासळल्याने कापसाच्या बाजारपेठेला मोठाच फटका बसलाशेतकºयांसह आता जिनिंग, सूतगिरणी व तेलगिरणी उद्योजकही हैराणपुढील वर्षासाठी गुलाबी आतापासूनच नियोजन करणे गरजेच

राम जाधव, आॅनलाईन लोकमतजळगाव दि़ २५ - राज्यभर गुलाबीबोंड अळीने उच्छाद घालून शेतकºयांचे अतोनात नुकसान केले़ यामुळे कापसाची गुणवत्ता ढासळल्याने कापसाच्या बाजारपेठेला मोठाच फटका बसला आहे़ जिनिंग, सूतगिरणी व तेलगिरणी उद्योजकांनाही हैराण केलेल्या या अळीने यावर्षी कहर केला़ त्यामुळे अर्धेअधिक उत्पादन खराब झालेले असताना, शेतकºयांना फरदड न घेताच कपाशीचे पीक उपटून फेकावे लागले़ त्यामुळे शेतकºयांचे फरदडचे संपूर्ण उत्पादन आजच बुडाले आहे़या बोंडअळीवर उपाययोजना म्हणून केवळ शेतकºयांनीच नाही, तर सर्वांनीच पुढील वर्षासाठी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कसा थांबवता येईल यासाठी आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे़ यासाठी या गुलाबी बोंडअळीचे संपूर्ण जीवनचक्र समजून घेणे गरजेचे आहे़ गुलाबी बोंडअळीची सुरुवात ही कोषावस्थेपासून होते़ कपाशीच्या लागवडीनंतर २५ ते ३५ दिवसांनी अनुकूल वातावरण मिळाल्यावर कोषावस्थेतील अळी पतंग रूपाने बाहेर पडते़ त्यानंतर पुढील ४ ते ८ दिवसात मादी आणि नर पतंगाचे मिलन होऊन मादी पतंग कपाशीच्या पातीमध्ये व फुलाच्या आजूबाजूला अंडी घालतेक़ाही दिवसातच फूल तयार होईपर्यंत या अंड्यांमधून लारवी (अळींचे पिल्ले) स्वरूपात अळींची निर्मिती होते़ ही लारवी फुलांच्या पाकळ्यामध्ये राहून परागकणांचे शोषण करू लागते़ येथे किमान १० ते १४ ही अळी राहून मग ती फुलाच्या ओव्हरीमध्ये जाऊन तयार होणाºया कैरीमध्येच स्थायिक होते़ इथे गेल्यावर या अळीला कोणतेही औषध नष्ट करीत नाही़ येथून पुढे ती कैरीत तयार होणारे कोवळे बी खाते, त्यामुळे बियाण्याची वाढ होत नाही़ तसेच धाग्यांचीही वाढ न होऊन लांबी व ताकत घटते़ त्यामुळे कमकुवत व पिळसर रंगाचा आणि कमी लांबीचा धागा या कापसापासून तयार होतो़ तर अनेक कैºयांना जास्त अपाय होऊन त्यातून कापूसच निघत नाही़ त्यामुळे प्रत्यक्षरित्या उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते़कापसात दिसणारी ही गुलाबी बोंडअळी जमिनीत पडून कोषावस्थेत जाते़ अळीची ही कोषावस्था सुप्तावस्था म्हणून ओळखली जाते़ या अवस्थेत हा कोष वर्षभरही जिवंत राहतो़ त्यामुळे पुढील वर्षी त्या क्षेत्रात पुन्हा कपाशी पिकाची लागवड केली की, कोषावस्थेत असलेली अळी पतंगाच्या रूपाने बाहेर येते व पुन्हा तिचे जीवनचक्र चालू होते़या अळीवर नियंत्रण मिळवायचे असेल तर तिचे जीवनचक्रच तोडणे गरजेचे आहे़ त्यासाठी एकात्मिक कीड व्यस्थापन हाच सर्वोत्तम पर्याय उपलब्ध आहे़कमी खर्चात पहिला उपाय म्हणजे संपूर्ण कपाशीच्या क्षेत्रात सर्व शेतकºयांनी कामगंध सापळे (फेरमन ट्रॅप) लावणे अत्यंत गरजेचे आहे़असे रोखता येईल गुलाबी बोंड अळीला१ पहिल्यांदा शेतातून लवकरात लवकर कपाशीचे पीक काढून ते नष्ट केले पाहिजे़ यामध्ये कपाशी उपटून जमा करावी़ प्रभावग्रस्त बोंडे, कैºया एका ठिकाणी जमा करून जाळून टाकाव्या़ उभ्या कपाशीत जनावरे सोडणे, रोटोव्हेटर चालविणे असे प्रकार करू नये़ यामुळे कैरीमधील अळी जमिनीत पडून कोषावस्थेत जाईल व पुढील हंगामात पुन्हा बाहेर येईल़२ पुढील हंगामात कपाशीची लागवड करताना पिकांची फेरपालट करावी़ त्याच त्या जमिनीत एकच पीक घेऊ नये़३ कपाशीची लागवड केल्यानंतर २५ ते ३५ दिवसात पतंग तयार होऊन मिलनास सक्षम होतात़ त्यामुळे कपाशी लागवड केल्यानंतर २२ व्या दिवशीच कामगंध सापळे बसविले जावे व त्यांचे गंध रसायन दर तीन आठवड्यांनी बदलावे़४ कपाशीची लागवड केल्यावर पिकाची परिस्थती पाहून १० ते १२ दिवसांच्या अंतराने निबोंळी अर्क व एका कीटकनाशकांची केवळ २ मि.ली. प्रती लीटर पाण्यातून फवारणी करावी़५ शेतकºयांनीही वाढणाºया भावाच्या प्रतीक्षेत कापूस भरून ठेवलेला असल्याने घरातीलही कापसातील अळी बियांना पोखरत आहेत, त्यामुळे या कापसाचे वजन घटणार आहे़ तरीही कापूस साठवायचा असल्यास शेतकºयांनी घरात किमान एकतरी कामगंध सापळा लावावा़६ जिनिंग व प्रेसिंग, सूतगिरणी, तेल गिरण्या इत्यादी ठिकाणी सर्वांनी आताच कामगंध सापळे बसविण्याचे काम करावे, जेणेकरून जमा झालेले सर्व पतंग नष्ट करता येतील़http://www.lokmat.com/vardha/farmer-was-dried-announcement-help-bollworm/

टॅग्स :cottonकापूसMaharashtraमहाराष्ट्र