पिंप्रीहाट-घुसर्डी शिवारात लाखावर केळीखोड उपटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 21:59 IST2020-08-29T21:59:47+5:302020-08-29T21:59:54+5:30
सीएमव्ही बाधीत क्षेत्राच्या पंचनाम्याची मागणी

पिंप्रीहाट-घुसर्डी शिवारात लाखावर केळीखोड उपटले
खेडगाव, ता. भडगाव : तालुक्यातील गिरणा काठालगतच्या पिंप्रीहाट,घुसर्डी व कोळगाव या शिवारातील जुन-जुलै महिन्यात लागवड केलेल्या केळीवर कुकुंबर मोझॅक व्हायरसचा(सीएमव्ही) प्रादुर्भाव झाल्याने तब्बल एक लाखावर केळी व खोड शेतक-यांनी उपटुन फेकले आहे. व्हायरसग्रस्त केळी क्षेत्राचे ३ संप्टेबंरपर्यंत पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतांनाही कृषिविभागाकडून विलंब होत आहे. रावेर, मुक्ताईनगर या तापीकाठाबरोबर आता गिरणापट्टाही या व्हायरसच्या कचाट्यात सापडला आहे.
व्हायरसग्रस्त केळी क्षेत्राचे पंचनामे सुरु करण्यात आले आहे.मात्र कृषिसहाय्यक पदे रिक्त असल्याने, अतिरिक्त भार १० कर्मचाऱ्यांवर आहे.तरीदेखील कृषिविभागाचा कर्मचारी, ग्रामसेवक व तलाठी यांचेवर जबाबदारी देण्यात आली आहे. सरपंच , जबाबदार पदाधिकारी यांच्या माहितीनुसार देखील पंचनाम्यात मदत घेतली जात आहे. असे तालुका कृषि अधिकारी बी.बी.गोराडे यांनी ‘लोकमत’ला सांगीतले
या भागात शेतकºयांनी लागवड केलेल्या टिश्शु कल्चर रोपांबरोबर इतर ठिकाणाहून आणलेल्या केळी खोड लागवडीवर देखील हा व्हायरस पसरला आहे.यामुळे सरसकट दिड-दोन महीन्याची केळी उपटुन फेकावी लागत आहे. रोप,खोड विकत घेत, लागवड, मशागत व रासायनिक खतांचा डोस असा एकरी तीस ते पन्नास हजारावर खर्च शेतकºयांचा झाला आहे. एरव्ही पाण्याअभावी केळी खोड उपटुन फेकण्याची वेळ शेतकºयांवर येते, तर आता हा व्हायरस आहे. मागील वर्षी गिरणा धरणात मुबलक पाणी असल्याने या भागात उशीराची मृग बाग लागवड वाढली आहे.आता हळुहळु हे सर्वच क्षेत्र या व्हायरसच्या कचाटयात सापडत आहे. त्यामुळे ते उपटुन फेकण्याची वेळ येत आहे.
तालुक्यात जवळजवळ दोन ते चार हजार हेक्टरवर केळी लागवड केली जाते. तात्काळ व्हायरसग्रस्त केळीखोडांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी, अशी बागाईतदारांची मागणी आहे.