Pimpalgaon Hareshwar police action on grasshopper | पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची गावठी हातभट्टीवर कारवाई
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची गावठी हातभट्टीवर कारवाई

ठळक मुद्दे६३ हजार रुपयांचे मद्य जप्त करून केले नाशसात जणाांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल

वरखेडी, ता.पाचोरा, जि.जळगाव : पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत शिंदाड, वाडी, सातगाव डोंगरी, वाडी शेवाळे येथे सहा ठिकाणी गावठी हातभट्टीवर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत ६३ हजार ८०० रुपयांचे कच्चे, पक्के रसायन व तयार दारू, हातभट्टी व रसायने साहित्य जप्त करून ते जागीच नाश करण्यात आले. याप्रकरणी सात जणांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.
सातगाव डोंगरी येथे टाकलेल्या धाडीत २४० लीटर कच्चे रसायन, ८० लीटर पक्के रसायन, २० लीटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त करण्यात आली. सात हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला. याप्रकरणी संशयित सुपडू रहमान तडवी रा.सातगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातगाव येथे दुसरी कारवाईत १२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करून राजू चांदखा तडवी रा.तडवी याच्यावर कारवाई करण्यात आली.
तिसऱ्या घटनेत सातगाव येथे सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संशयित फकिरा शेणफडू तडवी रा.सातगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
चौथ्या घटनेत शेवाळे येथे १२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करून संशयित रसूल बुधा तडवी रा.शेवाळे याच्यावर पोलिसांनी कारवाई केली.
शिंदाड येथे दोन ठिकाणी कारवाया करण्यात आल्या. त्यात दस्तगीत सबा तडवी रा.शिंदाड याच्याकडून नऊ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल, तर दुसºया कारवाईत हमीद लतीफ तडवी व भुरा लतीफ तडवी दोन्ही रा.शिंदाड यांच्याकडून १० हजार ४०० रुपयांचे मद्य जप्त करून ते नाश करण्यात आले.
या कारवाईत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल यांच्यासह पोलीस हवालदार उत्तम बाविस्कर, रणजीत पाटील, पो. कॉ. संदीप राजपूत, सचिन पवार ,दीपक पाटील व गृहरक्षक दलाचे जवान सामील होते.


Web Title: Pimpalgaon Hareshwar police action on grasshopper
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.