हजयात्रेकरूंना आयकरची अट नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 21:41 IST2020-10-12T21:39:07+5:302020-10-12T21:41:27+5:30
पवित्र हजयात्रेसाठी अर्ज भरताना आयकर रिटर्न्स आवश्यकतेची अट रद्द करण्यात यावी अशी मागणी शहर काँंग्रेस कमेटीतर्फे करण्यात आली आहे.

हजयात्रेकरूंना आयकरची अट नको
जामनेर : पवित्र हजयात्रेसाठी अर्ज भरताना आयकर रिटर्न्स आवश्यकतेची अट रद्द करण्यात यावी अशी मागणी शहर काँंग्रेस कमेटीतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार अरूण शेवाळे यांना देण्यात आले आहे. तसेच या संदर्भातील निवेदन राज्यातील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना व हज कमेटी अध्यक्ष यांनाही देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आयकर रिटन्सची लावण्यात आलेली जाचक अट रद्द करण्यात यावी. पवित्र हज यात्रेसाठी काही जण वर्षानुवर्षे रक्कम जमा करतात. पूर्ण रक्कम जमा झाल्यावर पवित्र हजयात्रेसाठी फार्म भरतात. तसेच काही मुस्लीम बांधव अनेक गरिबांना पण हजयात्रेसाठी पाठवतात. या मुद्यांंचा विचार करून लावण्यात आलेली जाचक अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कांँग्रेस अल्पसंख्याक शहराध्यक्ष मुसा पिंजारी, अश्फाक पटेल, रउफ शेख, रफिक मौलाना,पवन माळी आदी उपस्थित होते.