शासनाने मदत करण्याची छायाचित्रकारांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:21 IST2021-08-20T04:21:21+5:302021-08-20T04:21:21+5:30
जळगाव : जागतिक छायाचित्र दिनानिमित्त शहरातील सर्व छायाचित्रकारांतर्फे कॅमे-यांचे पूजन करण्यात आले. कोरोनाच्या काळात छायाचित्रकारांवर उपासमारीची वेळ आली ...

शासनाने मदत करण्याची छायाचित्रकारांची मागणी
जळगाव : जागतिक छायाचित्र दिनानिमित्त शहरातील सर्व छायाचित्रकारांतर्फे कॅमे-यांचे पूजन करण्यात आले. कोरोनाच्या काळात छायाचित्रकारांवर उपासमारीची वेळ आली असून साहित्य खरेदीसाठी घेतलेल्या खरेदीच्या कर्जावरील व्याज शासनाने मागे घ्यावे, अशी मागणी यावेळी छायाचित्रकारांनी केली.
ज्येष्ठ छायाचित्रकार संजय बोरसे यांच्या हस्ते कॅमेरापूजन करण्यात आले. यावेळी लीलाधर अत्तरदे, विशाल महाजन, मुकेश निंबाळकर, विजय पाटील, सागर चौधरी, भूपेंद्र तळेले, चंदू वाणी, पराग ढोबळे, राहुल मराठे, नीलेश जाधव, ज्ञानेश्वर पाटील, शरद पाटील, रामू तायडे, नितीन पाटील, नितीन कुंभार, दिनेश नेरकर, ललित राणे आदी उपस्थित होते.
क्रीडा संकुलात कार्यक्रम
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातही छायाचित्रकारांनी कॅमेरापूजन केले. यावेळी प्रकाश मुळे, नीलेश शिंदे, बाळकृष्ण गंगराज, योगेश गुरव, सागर पाटील, राहुल इंगळे, विशाल महाजन, भूपेंद्र तळेले, दिनेश बारी, गणेश बारी, गजानन पाटील आदी उपस्थित होते.