राष्ट्रवादीच्या बॅनरवर विष्णु भंगाळे यांचा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:17 IST2021-02-13T04:17:33+5:302021-02-13T04:17:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे शनिवारी जळगाव शहरात विविध कार्यक्रम घेणार आहेत. त्यांच्या स्वागताचे ...

Photo of Vishnu Bhangale on NCP banner | राष्ट्रवादीच्या बॅनरवर विष्णु भंगाळे यांचा फोटो

राष्ट्रवादीच्या बॅनरवर विष्णु भंगाळे यांचा फोटो

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे शनिवारी जळगाव शहरात विविध कार्यक्रम घेणार आहेत. त्यांच्या स्वागताचे बॅनर सर्वत्र लागले. मात्र सरदार पटेल सभागृहाच्या बाहेर लागलेल्या बॅनरवर माजी महापौर आणि शिवसेनेचे विष्णु भंगाळे यांचा फोटो लावण्यात आला. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेचा एक बडा पदाधिकारी राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र विष्णु भंगाळे यांनी याचे खंडन केले आहे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे शनिवारी सरदार पटेल सभागृहात जळगाव आणि धरणगाव तालुक्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी विष्णु भंगाळे यांनी सरदार पटेल सभागृह उपलब्ध करून दिले. त्याचसोबत पाटील यांच्या स्वागतासाठी लागलेल्या बॅनरवर भंगाळे यांचा फोटो आहे. त्यामुळे भंगाळे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. भंगाळे हे सुरेशदादा जैन गटाचे आहे. ते जळगावचे माजी महापौर देखील आहेत.

मी शिवसेनेतच - भंगाळे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वात मी शिवसेनेतच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा महाविकास आघाडीतील पक्ष असल्याने त्यांना सहकार्य केले. त्यातच राष्ट्रवादीत असलेल्या एका जुन्या सहकाऱ्याने बॅनरवर फोटो टाकला आहे. मी मात्र शिवसेनेतच आहे. - विष्णु भंगाळे, माजी महापौर

Web Title: Photo of Vishnu Bhangale on NCP banner