शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
4
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
5
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
7
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
8
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
9
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
10
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
11
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
12
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
13
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
14
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
15
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
16
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
17
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
18
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
19
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
20
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर

जामनेर तालुक्यातील लोंढ्री गावाजवळ पेट्रोलचा टँकर उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 5:55 PM

लोंढ्री, ता.जामनेर येथील पहूर बुलढाणा अंतर्गत रस्त्यावर पेट्रोलचा टँकर उलटल्याची घटना रविवारी दुपारी बाराला घडली.

ठळक मुद्देजीवितहानी टळलीतीन तास पेट्रोल गळतीपेट्रोल भरून नेणाऱ्या नागरिकांना पोलिसांचा प्रसाद

पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : लोंढ्री, ता.जामनेर येथील पहूर बुलढाणा अंतर्गत रस्त्यावर पेट्रोलचा टँकर उलटल्याची घटना रविवारी दुपारी बाराला घडली. सुदैवाने जीवित हानी टळली. पण तीन तास पेट्रोल गळतीने वित्त हानी झाली. वाहणारे पेट्रोल भरण्यासाठी गावाजवळील नागरिकांनी एकच झुंबड केल्याने घटनास्थळी दाखल पहूर पोलिसांनी त्यांना लाठ्यांचा प्रसाद दिला.पहूर ते बुलढाणा हा अंतर्गत रस्ता आहे. यादरम्यान लोंढ्री गावाजवळील काशिनाथ भागवत यांच्या शेताजवळ वळण रस्त्यावर एमएच-२०-एए-९९८८ क्रमांकाचा पेट्रोलने भरलेला ट्रक उलटला. हा टँकर फत्तेपूर येथील एका पेट्रोलपंपावर खाली करण्यात येणार होता. यात सहा हजार लीटर पेट्रोल व सहा हजार लीटर डिझेल भरलेले होते. झालेल्या गळतीने सैयद नूर अली अश्रफ या शेतकºयाच्या शेतातील कपाशी पिकांचे नुकसान झाले आहे. गळती लागल्याने गावाजवळील काही नागरिकांनी मदत करण्याऐवजी पेट्रोल वाहण्यास एकच गर्दी केली. त्यामुळे घटनास्थळी सुरक्षेचा प्रश्न समोर आल्याने १० मिनिटात पहूरवरून घटनास्थळी दाखल झालेले सपोनि राजेश काळे, पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे, भरत लिंगायत, प्रवीण देशमुख, जितेंद्र परदेशी, अनिल सुरवाडे यांनी नागरिकांना पेट्रोल घेऊन जाण्यास मज्जाव केला. वेळेप्रसंगी त्यांना लाठ्यांचा चोप दिल्याने जमलेला जमावाला सुरक्षित अंतरावर पांगविले त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. यादरम्यान काळे यांनी अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण करण्यात आले. याचबरोबर आरसीएफ तुकडी बंदोबस्तासाठी लावण्यात आली. अखेर दुपारी तीन वाजता उलटलेल्या टँकरला क्रेनच्या साहाय्याने सुरळीत करण्याची तयारी सुरू झाली. सायंकाळी पाचपर्यंत हा टँकर रस्त्यावर पूर्ववत करण्यात यश आले. 

टॅग्स :Petrolपेट्रोलJamnerजामनेर