जळगाव : पुष्पलता बेंडाळे चौकातील भारत पेट्रोलियमच्या संरक्षक भिंतीच्या जागेवर हक्क दाखवून माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत चौधरी यांनी पेट्रोल पंप चालकाला धमकी दिल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी शनी पेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
बेंडाळे चौकात लीजवर घेतलेल्या जागेत दिलीप समरथमल गांधी यांचा भागीदारी फर्म अंतर्गत पेट्रोलपंप आहे. याठिकाणी असलेली संरक्षक भिंत जीर्णावस्थेमुळे पडली होती. गांधी यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्वखर्चाने बांधून घेतली, मात्र माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी हे या जागेवर स्व हक्क सांगत गांधी यांचेशी भिंतीच्या मुद्द्यावरून वारंवार वाद घालत ‘माझे वरपर्यंत हात असल्याचे सांगत धमकावत लागले . एव्हढ्यावरच न थांबता चौधरी यांनी माणसांकडून भिंत
तोडण्याचा प्रयत्न देखील केला, या आशयाची तक्रार पेट्रोल पंप चालकाने शनी पेठ पोलीस स्टेशनला केली आहे, याबाबत अदखलपात्र नोंद करण्यात आली आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे .