शहरं
Join us  
Trending Stories
1
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
2
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
3
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
4
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
5
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
6
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
7
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
8
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
9
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
10
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
11
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
12
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
13
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
14
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
15
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
16
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
17
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
18
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
19
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
20
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात मृत्यू झालेल्या 'त्या' व्यक्तीची ओळख पटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST

जळगाव - जैन पेट्रोल पंपाजवळील राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी अज्ञात कंटेनरच्या धडकेत पायी जाणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्या ...

जळगाव - जैन पेट्रोल पंपाजवळील राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी अज्ञात कंटेनरच्या धडकेत पायी जाणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्या व्यक्तीची ओळख पटली असून राजेश मदन राजपूत (४५, रा. रामेश्वर कॉलनी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आकाशवाणी चौकाजवळील जैन पेट्रोलपंपासमोरील राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास राजेश राजपूत हे कामाच्या शोधात पायी जात होते. त्याच दरम्यान मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने त्यांना रिक्षातून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नंतर दुपारी उपचारादरम्यान जखमी राजेश राजपूत यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीचा मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात घेतली धाव

महामार्गावर अपघात झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नातेवाइकांनी रात्री उशिरा जिल्हापेठ पोलिसात धाव घेतली. त्यानंतर मयताची ओळख पटली. राजेश हे पत्नी, मुलगा व एक मुलगीसह रामेश्वर कॉलनीत वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली. ते कामाच्या शोधात होते, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बोरसे करीत आहे.