शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

भडगाव तालुक्यातील महिंदळे येथे वाहून जाणाऱ्या पाण्याला लोकसहभातून आणले तलावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 4:20 PM

महिंदळे परिसरात नाले केटीवेअर पूर्ण कोरडेठाक पडले आहेत व विहिरींनीही तळ गाठला आहे. पण गावाजवळ असलेला पाझर तलाव मात्र याला अपवाद ठरत आहे. परिसरात कुठेही पाणी नसताना पाझर तलावात अजूनही बºयापैकी पाणी साठा आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात पशुपक्ष्यांची तहान भागवण्यासाठी व गावातील महिलांना धुणी भांडीसाठी पाझर तलाव उपयोगी ठरत आहे.

ठळक मुद्देपरिसरात विहिरींनी गाठला तळपाझर तलावावर पाणी पिण्यासाठी दूरवरून येतात गुरेपाझर तलावाचे अपूर्ण काम पूर्ण करावेपरिसरात पाण्याचा स्त्रोत म्हणून फक्त एकच पाझर तलाव

भास्कर पाटीलमहिंदळे, ता.भडगाव, जि.जळगाव : परिसरात नाले केटीवेअर पूर्ण कोरडेठाक पडले आहेत व विहिरींनीही तळ गाठला आहे. पण गावाजवळ असलेला पाझर तलाव मात्र याला अपवाद ठरत आहे. परिसरात कुठेही पाणी नसताना पाझर तलावात अजूनही बºयापैकी पाणी साठा आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात पशुपक्ष्यांची तहान भागवण्यासाठी व गावातील महिलांना धुणी भांडीसाठी पाझर तलाव उपयोगी ठरत आहे.येथील पाझर तलाव हा स्वातंत्र्य पूर्व काळातील आहे . परंतु यात मोठ्या प्रमाणात गाळ होता. त्यामुळे साठवण क्षमता कमी होती व यात येणारे पाणी अत्यल्प होते. हे गावातील तरुणांनी हेरले व प्रथम लोकसहभागाने यातील गाळ मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी काढून तो शेतात टाकला. परिणामी आपोआप खोलीकरण झाले. परंतु दरवर्षी पावसाच्या प्रमाणात घट होत आहे. तलावात पाणी कमी प्रमाणात येत होते व तलाव डिसेंबर महिन्यातच आटत होता. तलावाला लागून जंगल आहे. त्या जंगलातील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात इतरत्र वाहून जात होते. त्या पाण्याला योग्य वळसा कसा घालता येईल याविषयी गावात चर्चा करून गावात वर्गणी गोळा केली. आमदार किशोर पाटील यांच्या सहकार्याने जेसीबी मशीन मिळाले. ग्रामस्थांनी त्यात इंधन पुरवले. दोन किलोमीटरपर्यंत मोठी पाटचारी खोदली. या पाण्यामुळे आज तलावात बºयापैकी जलसाठा आहे. परिसरात यावर्षी दोनच पाऊस पडले आहेत. तरीही तलावात परिसरातील प्राण्यांसाठी पिण्यासाठी पाणी साठा आहे.परिसरातील विहिरींनी पूर्ण तळ गाठला आहे. परंतु तलावातील पाणी परिसरातील गुरे व पक्ष्यांसाठी जीवनदायी ठरत आहे. लांब अंतरावरुन येथे पाणी पिण्यासाठी पशुपक्षी येत आहेत.रखडलेल्या तलावाच्या कामाला मुहूर्त मिळेल काय?गेल्या तीन वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेतून तलावात खोलीकरण, भिंतीची उंची वाढवणे व भिंतीला दोघांची पिंचिंग करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. थोडक्यात खोलीकरण झाले व कामाला ग्रहण लागले. ते आजतागायत लागलेलेच आहे. काम आजही बंदच आहे. या तलावाच्या कामात गैरप्रकार झाला असावा म्हणून इतक्या दिवसांपासून काम बंद आहे. याकडे संबंधित आधिकाºयांनी लक्ष द्यावे व त्वरित अपूर्ण अवस्थेत बंद पडलेले काम सुरू करावे अन्यथा ग्रामस्थ उपोषणाच्या तयारीत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhadgaon भडगाव