भुसावळ येथे महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या ९० प्रवाशांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 00:37 IST2018-10-09T00:35:30+5:302018-10-09T00:37:03+5:30

भुसावळ येथे महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या ९० प्रवाशांना दंड
भुसावळ, जि.जळगाव : गाडी क्रमांक १२७८० अप हजरत निजामुद्दीन-गोवा एक्सप्रेसच्या महिला डब्यात प्रवास करणाºया ९० प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
गोवा एक्सप्रेसच्या महिला डब्यांमध्ये पुरुष प्रवासी प्रवास करीत असतानाचा प्रकार गाडी भुसावळरेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक तीनवर सोमवारी सकाळी ७.३० वाजता आली असता लक्षात आले. फलाटावरील कर्तव्यावर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक दिनेश नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जे.एल.शहा, उपनिरीक्षक लवकुश शर्मा, संजय पाटील यांनी प्रवाशांना उतरवून रेल्वे कोर्टात नेले. तेव्हा प्रत्येकी १०० प्रमाणे ९० प्रवाशांना नऊ हजाराची दंडात्मक कारवाई केल्यानंतर सोडण्यात आले.