ममुराबादमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:24 IST2021-09-10T04:24:42+5:302021-09-10T04:24:42+5:30

ममुराबाद : सामाजिक सलोख्याबरोबरच कोरोना महामारीबाबत असलेल्या शासकीय नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन गुरुवारी ममुराबाद येथे झालेल्या ...

Peace meeting on the backdrop of Ganeshotsav in Mamurabad | ममुराबादमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता बैठक

ममुराबादमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता बैठक

ममुराबाद : सामाजिक सलोख्याबरोबरच कोरोना महामारीबाबत असलेल्या शासकीय नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन गुरुवारी ममुराबाद येथे झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.

तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या उपस्थितीत ममुराबाद येथील ग्रामपंचायत कार्यालयात शांतता कमिटीची बैठक झाली. त्यावेळी रामकृष्ण कुंभार यांनी सांगितले की, गणेश मंडळांनी योग्य नियोजन करावे. सामाजिक सलोख्यात कोणतीही बाधा येणार नाही, याची काळजी घ्यावी. शासनाचे नियम व अटी यांचे पालन करून गणेश उत्सव शांततेने साजरा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक कासार, नयन पाटील, विश्वनाथ गायकवाड, पोलीस पाटील आशा धनराज पाटील, सरपंच हेमंत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य हिमांशू तिवारी, अमर पाटील, शैलेंद्र पाटील, विलास सोनवणे, गोपाल मोरे, शेख नासिर, राजेंद्र शिंदे यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Peace meeting on the backdrop of Ganeshotsav in Mamurabad