स्मारकांच्या स्वच्छतेने केली जातेय देशभक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 11:49 PM2019-08-14T23:49:54+5:302019-08-14T23:50:10+5:30

स्वराज्य निर्माण सेनेचा उपक्रम

Patriots are being cleansed of monuments | स्मारकांच्या स्वच्छतेने केली जातेय देशभक्ती

स्मारकांच्या स्वच्छतेने केली जातेय देशभक्ती

Next

जळगाव : ज्या महापुरूषांनी देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले, अशा महापुरूषांच्या स्मारकांच्या साफसफाईकडे सर्वाचेंच दुर्लक्ष होत असते़ मात्र, शहरातील स्वराज्य निर्माण सेना महाराष्ट्र या संघटनेकडून अनेक वर्षापासून ह्यस्मारक स्वच्छताह्ण हा स्तुत्य उपक्रम राबवून शहरामधील महापुरूषांच्या स्मारकांची साफसफाई करून आपली देशभक्ती जोपासत आहेत़
स्वराज्य निर्माण सेनेची सन २०१२ मध्ये संस्थापक अध्यक्ष महेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापना झाली़ बघता-बघता ही संघटना तब्बल ९२ गावांमध्ये पोहोचली़ अन् तब्बल पाच हजाराच्यावर स्वराज्य सैनिक या संघटनेशी जुळले़ छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती तरूण पिढीला व्हावी आणि महाराजांचे विचार तरूणांमध्ये रूजावे हा उद्दीष्ट ठेवून संघटनेकडून सर्वात आधी ह्यशिव वंदनाह्ण हा उपक्रम राबविण्यात आला़ यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली आरती शिवतीर्थ मैदानावर म्हटली जाते़ यात आरतीतून महाराजांच्या कार्याची माहिती मिळतेच, त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावकरांच्या आठवणींना सुध्दा उजाळा दिला जातो़ शिवराय आणि आजची तरूण पिढी या विषयावर व्याख्यान दिले जाते.
जळगाव, धुळे तसेच नंदुरबार व बुलढाणा जिल्ह्यात सुध्दा स्वराज्य सैनिक आहेत़ या सैनिकांकडून देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या महापुरूषांच्या स्मारकांची साफसफाई करून चकचकीत केले जाते़ तर दर आठवड्याला मंदिरांची कळसापासून तर पायथ्यापर्यंत स्वराज्य सैनिकांकडून सफाई करण्यात येते़ दिवाळीत पहिला दिवा हा स्वराज्य सैनिकांकडून घरात नव्हे तर मंदिर, शिवतीर्थ मैदान आणि स्मारकांवर लावून दिवाळी साजरी करून देशभक्ती जोपासली जाते़
ंशिवगंध जपतोय पारंपारिक संस्कृती
स्वराज्य निर्माण सेनेचे शिवगंध हे पारंपारिक संस्कृती जपणारे ढोल पथक तयार करण्यात आले आहे़ या पथकाचे महाराष्ट्रभर नाव पसरले आहे़ एवढेच नव्हे गणेशोत्सव व दुर्गोत्सव पथकाला मिळणाऱ्या पैशातूनच स्वराज्य निर्माण सेनेकडून सामाजिक उपक्रम राबविले जातात़ भारतीय संस्कृती सोबतच महापुरूषांची माहिती जास्तीत-जास्ती तरूणांपर्यंत पोहोचावी हा उद्देश ठेवून संघटना काम करित आहे़

 

Web Title: Patriots are being cleansed of monuments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.