पातोंडा विकासो संचालक मंडळ अखेर बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 21:26 IST2019-09-19T21:25:55+5:302019-09-19T21:26:01+5:30

पातोंडा,ता. अमळनेर : येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या आठही संचालककांचे राजीनामे अखेर मंजूर झाले. १६ सप्टेंबर रोजी सहाय्यक निबंधक गुलाब ...

Patondo Development Board finally dismissed | पातोंडा विकासो संचालक मंडळ अखेर बरखास्त

पातोंडा विकासो संचालक मंडळ अखेर बरखास्त



पातोंडा,ता. अमळनेर : येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या आठही संचालककांचे राजीनामे अखेर मंजूर झाले. १६ सप्टेंबर रोजी सहाय्यक निबंधक गुलाब पाटील यांनी विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर प्रशासकाची नेमणूक केली आहे.
सचिव राजेंद्र जगन्नाथ वाणी व चेअरमन पंडित लाड यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून तेरापैकी आठ संचालकांनी सचिव राजेंद्र वाणी व सहाय्यक निबंधकांकडे १८ जुलै रोजी राजीनामे दिले होते. १६ आॅगस्ट रोजी झालेल्या मासिक सभेत आठही संचालकांनी आपले राजीनामे बोट उंचावून मंजूर केले. परंतु सचिवांनी आठपैकी अनिल बागुल, विठ्ठल चौधरी व श्रीकृष्ण पवार या तीनच संचालकांचे राजीनामे मंजूर केले होते. त्यानंतर उर्वरित सर्जराव बोरसे, सुभाष पवार, किसन मोरे, विमलबाई पवार, सुरेश बिरारी या पाचही संचालकांनी पुन्हा सहाय्यक निबंधकांकडे प्रत्यक्ष जाऊन राजीनामे दिले. पळताळणीअंती १६ सप्टेंबर रोजी पाचही संचालकांचे राजीनामे सहकारी संस्थेच्या नियमाप्रमाणे मंजूर केले. संस्थेवर जिल्हा बँक क्षेत्रीय अधीकारी पांडुरंग चौधरी यांची प्रशासकपदी नियुक्ती केली.

 

Web Title: Patondo Development Board finally dismissed