पाचो:यातील अट्टल चोरटय़ाच्या मुसक्या आवळल्या

By Admin | Updated: June 6, 2017 15:49 IST2017-06-06T15:37:28+5:302017-06-06T15:49:35+5:30

स्थानिक गुन्हा शाखेने केला दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत

PATO: The rumors of the inert thieves | पाचो:यातील अट्टल चोरटय़ाच्या मुसक्या आवळल्या

पाचो:यातील अट्टल चोरटय़ाच्या मुसक्या आवळल्या

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि.6 - पाचोरा शहरातील मोबाईल चोरीच्या घटनांचा छडा लावताना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने विक्रम उर्फ बुट्टया विनोद अहिरे (वय 29 रा.  बाहेरपुरा, पाचोरा) या अट्टल मोबाईल चोरटय़ाला अटक करीत त्याच्याकडून दोन लॅपटॉप, टॅब, विविध कंपनीचे 7 मोबाईल असा एकूण 1 लाख 36 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून पाचोरा शहरात मोबाईल चोरी, घरफोडय़ा करुन चोरटय़ांनी धुमाकुळ घातला होता. पाचोरा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा  पाचोरा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा समांतररित्या तपास करीत होते. 
स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांना रविवारी पाचो:यातील मोबाईल चोरीच्या घटनांच्या मागे असलेला विक्रम या अट्टल मोबाईल चोरटय़ाची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी तेथे पथक पाठवून विक्रमला ताब्यात घेतले. 

Web Title: PATO: The rumors of the inert thieves