शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले 75 टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 2:50 PM

33 हजार रुग्णांची कोरोनावर मात : एक लाख 84 हजार चाचण्या पूर्ण

जळगाव : जिल्ह्यात 20 सप्टेंबर रोजी एकाच दिवसात 605 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत 32 हजार 941 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.04 टक्क्यांवर पोहोचले आहे. जिल्ह्यात सध्या 9 हजार 860 ॲक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून त्यापैकी 3 हजार 494 रुग्ण गृह अलगीकरणात आहेत. जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आतापर्यंत 1 लाख 83 हजार 808 संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून ॲक्टीव्ह रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपापयोजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दैनंदिन चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आली असून लक्षणे जाणवताच नागरीकांनी तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.सध्या जिल्ह्यात आरटी-पीसीआरद्वारे 86 हजार 926 तर रॅपिड ॲन्टीजेन टेस्टद्वारे 96 हजार 882 अशा एकूण 1 लाख 83 हजार 808 तपासण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 1 लाख 38 हजार 63 चाचण्या निगेटिव्ह तर 43 हजार 897 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून इतर अहवालांची संख्या 1 हजार 88 असून 760 अहवाल प्रलंबित आहेत.जिल्ह्यात सध्या 9 हजार 860 बाधित रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये 4 हजार 890 रुग्ण, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 807, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 669 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 3 हजार 494 रुग्ण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. शिवाय विलगीकरण कक्षातही 438 रुग्ण आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे नसलेले 8 हजार 384 रुग्ण असून लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 476 इतकी आहे. यापैकी 669 रुग्णांना ऑक्सिजन वायू सुरु असून 287 रुग्ण हे आयसीयुमध्ये दाखल आहे.जिल्ह्यात आतापर्यतच्या बाधित रुग्णांची संख्या 43 हजार 897 इतकी झाली आहे. यापैकी 32 हजार 941 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात रुग्णांचा मृत्युदर हा 2.50 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात प्रशासनास यश आले आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी सीसीसी व इतर रुग्णालयांमध्ये 12 हजार 854 इतके बेड आहेत. यात 263 आयसीयू बेड तर 1 हजार 643 ऑक्सिजनयुक्त बेडचा समावेश आहे.जिल्ह्यात तालुकानिहाय आतापर्यंत आढळून आलेले बाधित रुग्णजिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 43 हजार 897 इतकी झाली आहे. यामध्ये जळगाव शहर 9814, जळगाव ग्रामीण 2238, भुसावळ 2689, अमळनेर 3836, चोपडा 3686, पाचोरा 1707, भडगाव 1698, धरणगाव 1951, यावल 1447, एरंडोल 2623, जामनेर 3099, रावेर 1808, पारोळा 2235, चाळीसगाव 2844, मुक्ताईनगर 1180, बोदवड 708, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात असलेल्या 334 रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात तालुकानिहाय आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्याजळगाव शहर 6799, जळगाव ग्रामीण 1431, भुसावळ 1898, अमळनेर 3030, चोपडा 2409, पाचोरा 1539, भडगाव 1491, धरणगाव 1552, यावल 1162, एरंडोल 1846, जामनेर 2396, रावेर 1320, पारोळा 1709, चाळीसगाव 2495, मुक्ताईनगर 1122, बोदवड 524, इतर जिल्ह्यातील 218 याप्रमाणे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 32 हजार 941 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे.जिल्ह्यात तालुकानिहाय उपचार घेत असलेल्या (ॲक्टिव्ह) रुग्णांची संख्याजिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेले 9 हजार 860 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. यामध्ये जळगाव शहर 2786, जळगाव ग्रामीण 733, भुसावळ 669, अमळनेर 716, चोपडा 1209, पाचोरा 102, भडगाव 167, धरणगाव 353, यावल 233, एरंडोल 736, जामनेर 637, रावेर 406, पारोळा 509, चाळीसगाव 282, मुक्ताईनगर 32, बोदवड 174, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 116 रुग्णांचा समावेश आहे.तालुकानिहाय उपचारादरम्यान मृत्यु झालेल्या रुग्णांची संख्याजिल्ह्यात आतापर्यत उपचारादरम्यान 1 हजार 96 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यामध्ये जळगाव शहर 229, जळगाव ग्रामीण 74, भुसावळ 122, अमळनेर 90, चोपडा 68, पाचोरा 66, भडगाव 40, धरणगाव 46, यावल 52, एरंडोल 41, जामनेर 66, रावेर 82, पारोळा 17, चाळीसगाव 67, मुक्ताईनगर 26, बोदवड 10 मृतांचा समावेश आहे. उपचारादरम्यान एकूण मृत्यु झालेल्या 1 हजार 96 रुग्णांपैकी 956 मृत्यु हे 50 पेक्षा जास्त वयोगटातील असून 508 मृत्यु हे आजारपण असलेले आहेत.जिल्ह्यातील 5 हजार 22 ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषितकोरोना बाधित रुग्ण आढळलेला भागाचे निर्जतुकीकरण करणे तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांची तपासणी करण्यासाठी हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 5 हजार 22 ठिकाणे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 2 हजार 279, शहरी भागातील 1 हजार 280 तर जळगाव महापालिका क्षेत्रातील 1 हजार 463 ठिकाणांचा समावेश आहे. या क्षेत्रांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी 6 हजार 236 टिम कार्यरत आहे. या क्षेत्रात 2 लाख 54 हजार 476 घरांचा समावेश असून यात 11 लाख 10 हजार 910 इतकी लोकसंख्येचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव