शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सीमा तपासणी नाक्यावरून जाऊ न दिल्याने रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 16:58 IST

संतप्त झालेल्या नागरिकांनी तपासणी नाक्यावर आंदोलन केले. महाराष्ट्राच्या सीमेत असलेला तपासणी नाका हटवण्याची मागणी केली.

ठळक मुद्देअंतुर्ली फाट्यावर आंदोलनचर्चेनंतर अखेर नाका मध्य प्रदेशात हलवला

मुनाफ शेखअंतुर्ली, ता.मुक्ताईनगर : अंतुर्ली फाटा येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश शासनाकडून लावण्यात आलेल्या तपासणी नाक्यावरुन रुग्णाला घेऊन जाणाऱ्या गाडीला जाऊ न दिल्याने मुक्ताईनगर येथील खासगी रुग्णालयात पोहचण्यास विलंब झाल्याने रुग्ण दगावला. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी तपासणी नाक्यावर आंदोलन केले. महाराष्ट्राच्या सीमेत असलेला तपासणी नाका हटवण्याची मागणी केली.बंडू वामन बावस्कर यांची प्रकृती १९ च्या पहाटे खराब झाल्याने त्यांना खासगी वाहनाने मुक्ताईनगर येथील रुग्णालयात नेत येत होते. अंतुर्ली फाटा येथील मध्य प्रदेशच्या तपसणी नाक्यावर त्यांच्या वाहनाला अडवण्यात आले. मुक्ताईनगर येथील रुग्णालयात घेऊन जात असल्याचे सांगूनसुद्धा तेथील पोलिसांनी जाऊ दिले नाही. त्याना तेथून परत पाठवले. ते नायगाव मार्गे दवाखान्यात गेले. तो ार्यंत रुग्णाचे निधन झाले होते.आंदोलनाची माहिती मिळताच खासदार रक्षा खडसे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश साळुंके आंदोलनस्थळी दाखल झाले. खासदार खडसे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. मध्यप्रदेशातील शेतीशिवारात शेतकऱ्यांना, मजुरांना नायगाव मार्गे रस्ता अत्यंत खराब असल्याने मुक्ताईनगर, जळगाव येथे कामानिमित्त व दवाखान्यात जाण्यासाठी इच्छापूर मार्गे रस्ता चांगला असल्याने अंतुर्ली, पातोंडी व नरवेल येथील लोक जातात. परंतु तपासणी नाक्यावरील पोलीस जाऊ देत नसल्याने लोकांचा उद्रेक अनावर झाला. यानंतर खासदार खडसे यांनी बºहाणपूरच्या जिल्हाधिकाºयांशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क करून समस्या सांगितली. यामुळे अंतुर्ली फाट्यावरील हा तपासणी नाका शाहपूर रस्त्यावरील शिरसोदा फाट्यावर हलवण्यात आला. परिणामी अंतुर्लीसह परीसरातील नागरिकात समाधान व्यक्त केले.यावेळी शाहपूर पोलीस स्टेशनचे पो.नि. संजय पाठक, बºहाणपूरचे तहसीलदार गोविंदसिंग रावत, मुक्ताईनगरचे तहसीलदार श्याम वाडकर, पो.नि. सुरेश शिंदे, सरपंच नरेंद्र दुट्टे, कृषी उत्पादन बाजार समितीचे संचालक प्रशांत महाजन, सुनील पाटील, वि.का. संस्थेचे चेअरमन सुधीर तराळ, ताहेरखा पठाण, विलास पांडे, राजू माळी यांच्यासह केळी व्यापारी, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनMuktainagarमुक्ताईनगर