शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

पाटणादेवी : खान्देशातील जागृत वरदहस्त शक्तीपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 13:13 IST

महाराष्ट्रातील मोठे मंदिर 

ठळक मुद्देश्री संत जर्नादन चरीत्रामध्ये उल्लेख गोविंद स्वामी यांनी तपस्या करुन चंडीकेला प्रसन्न

जिजाबराव वाघ / ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव, जि. जळगाव दि. 19 - शारदीय नवरात्रोत्सव व वासंतिक यात्रोत्सवात आदिशक्तिचा जागर करताना भक्तिभावाचा जणू मोगराच फुलून येतो. नवरात्रीचे पर्व आणि शक्तिपिठांचे स्थान महात्म्य, भाविकांची होणारी अलोट गर्दी हा उत्साही दरवळही ओंसाडून वाहत असतो. खान्देशातील जागृत वरदहस्त शक्तिपीठ म्हणून पाटण्याच्या चंडीका भगवतीची राज्यभर ख्याती आहे. चाळीसगाव शहरापासून अवघ्या 18 किमी अंतरावर नैऋत्येला असणारे हे शक्तीपीठ निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. वर्षभर येथे भक्तांचा राबता असला तरी नवरात्रीच्या पर्वणीवर अलोट गर्दी होते. आद्य गणितीतज्ञ  भास्कराचार्य यांची तपोभूमी, प्रेक्षणीय पुरातन ऐतिहासिक स्थळे, असे भक्ती आणि पर्यटनाचे साज असल्याने या क्षेत्राचे सौदर्य अधिक खुलले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात आदिशक्तिचा जागर मनात साठविण्यासाठी परराज्यातूनही भाविक येथे आवजरून हजेरी लावतात. 

श्री संत जर्नादन चरीत्रामध्ये उल्लेख 1128 मध्ये पाटणादेवीचे मंदिर उभारले गेले. त्यांचे लोभस रुपडे हेमाडपंथीय काळाची साक्ष देते. देवगिरीचे मांडलिक राजे यादवराव खेऊनचंद्र व गोविंदराज मौर्य यांनी 1150 मध्ये मंदिराचे लोकार्पण केले. खान्देशात पुराणकाळापासून पाटणा (विज्जलगड) स्थळाला महत्व होते. पर्वतराजींवर असणारी दूर्मिळ वनौषधी, खाणी यामुळे या क्षेत्राला र कला, देवस्थान, व्यापार अशी समृद्धता  लाभली होती. 

वरदहस्त शक्तिपीठाची अख्यायिकामाता सतीचे वडील दक्षप्रजापती यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. सती मुलगी असूनही तिच्यासह तिचे पती महादेव यांना त्यांनी निमंत्रण दिले नाही. असे असूनही नारादमुनींच्या सूचनेवरुन माता सती यज्ञ सोहळ्यास येतात. मात्र येथे तिचा पुन्हा अपमान केला जातो. तेव्हा माता सती अपमान झाला म्हणून स्वत:च्या शरिरातील प्राण काढून घेते. तिचे शव यज्ञ मंडपात पडते. ही गोष्ट महादेवांना समजताच ते क्रोधीत होतात. तिचे शव हातात घेऊन तांडव नृत्य करु लागतात. त्यांचा तिसरा नेत्रही उघडल्याने सर्वत्र थरकाप उडतो. अशावेळी त्यांना शांत करण्यासाठी भगवान विष्णु सुदर्शन चक्राने सतीच्या शवाचे तुकडे करतात. उजव्या हाताचा तुकडा पाटणा येथे पडल्याने येथे आदिशक्तिचीचे जागृत वरदहस्त शक्तिपीठ निर्माण झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. देवीचे आद्य उपासक गोविंद स्वामी यांनी तपस्या करुन चंडीकेला प्रसन्न केले. भक्तांसाठी उंच कड्यावरुन खाली यावे. अशी विनंती गोविंद स्वामींनी भगवतीला केली. यावर भगवातीने होकार देतांना गोविंद स्वामींना मागे न पाहता पुढे चालण्यास सांगितले. धवलतीर्थाजवळ त्यांना विचित्र आवाज येतो. भगवती मागे आहे की नाही हे पाहण्यासाठी ते मागे पाहतात. त्याचवेळी ती अदृश्य होते. गोविंद स्वामी पुन्हा तपश्चर्या करतात. भगवती प्रसन्न होते.  कुंडात स्नान कर माझी स्वयंभु मुर्ती तुज्या हातात येईल. असे भगवती सांगते. पाटणादेवीच्या मंदिरात त्याच पाषाणाच्या स्वयंभु मूर्तीची स्थापना गोविंद स्वामी यांनी केली आहे. कुलस्वामिनी आणि कुळाचारभगवतीचे मुखमंडल कमालीचे तेजस्वी आहे. अनेक हिंदू जाती-जमातींची भगवती कुलस्वामिनी असून मनोभावे भाविक सर्व कुळाचार करतात. बहुतांशी भाविक आदिशक्तीचे स्मरण करुन धवलतीथार्तुन तांदळा घेऊन हसातमुखाने माघारी फिरतात. पौर्णिमेस  महापुजा केली जाते. शारदीय नवारात्रोत्सव व वासंतिक यात्रोत्सव साजरे केले जातात. महाराष्ट्रातील मोठे मंदिर आदिशक्तिचे मंदिर 12 व्या शतकात उभारले गेले आहे. राज्यातील हेमाडपंथीय मोठ्या मंदिरांमध्ये त्याची गणना होते. 10 ते 12 फूट उंच चौथ-यावर त्याची रचना पुर्वेभिमुख करण्यात आली आहे. गाभारा चंद्राकृती असून त्याल 28 कोपरे आहेत. 75 बाय 36 फूट मंदिराची लांबी-रुंदी तर 18 फूट उंची आहे. गाभा-यात सभामंडपामध्ये एक पुरातन शिलालेखही आहे. 

शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. दरवर्षी येथे हजारो भाविक येतात. मनोभावे नवस करतात. त्यामुळे नवस फेडणा-या भक्तांचीही गर्दी होते. कुलस्वामिनी म्हणूनही देवीचे महात्म्य आहे. कुळाचार पाळणारे भाविक नवरात्रोत्सवात पुजाही करतात. परराज्यातूनदेखील भाविक येतात.- बाळकृष्ण जोशी, व्यवस्थापक, पाटणादेवी मंदीर.