प्रवाशांना रेल्वे स्टेशनवरही मिळणार घरगुती पद्धतीचे जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:46 IST2021-01-08T04:46:49+5:302021-01-08T04:46:49+5:30
असून, मार्च अखेर ही कॅन्टींन सुरू होणार आहे. भुसावळ रेल्वे स्टेशन प्रमाणे जळगाव रेल्वे स्टेशन वरही जिल्ह्याचे ठिकाण असल्याने ...

प्रवाशांना रेल्वे स्टेशनवरही मिळणार घरगुती पद्धतीचे जेवण
असून, मार्च अखेर ही कॅन्टींन सुरू होणार आहे.
भुसावळ रेल्वे स्टेशन प्रमाणे जळगाव रेल्वे स्टेशन वरही जिल्ह्याचे ठिकाण असल्याने रात्रभर प्रवाशांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना किंवा गाडीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासात घरगुती पद्धतीचे जेवण मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे प्रवाशांची
गरज भागविण्यासाठी आयआरटीसीतर्फे रेल्वे स्टेशनवर कॅन्टींनची उभारणी करण्यात येत आहे. फ्लॅटफार्म क्रमांक तीनवर कॅन्टींनचे ५० टक्के काम पूर्ण झाले असून, यानंतर फर्नीचरचे काम हाती घेण्यात येणार आहे. मार्च अखेर प्रवाशांच्या सेवेत कॅन्टींनची सुविधा सुरू करण्याचे
नियोजन रेल्वे प्रशासनाचे आहे.
घरगुती पद्धतीचे मिळणार जेवण :
रेल्वे प्रशासनातर्फे या कॅन्टींनमध्ये वडापाव, समोरा, इडली, भजी, चहा, विविध प्रकारचे थंड पेये, बिस्किटे यासह घरगुती पद्धतीचे भाजी पोळीचे जेवणही मिळणार आहे. प्रवासात असणाऱ्या नागरिकांना आयआरटीसीच्या वेबसाईटवरून जेवणाची आर्डर दिल्यानंतर, जळगाव स्टेशन येईपर्यंत तयार जेवण मिळणार आहे. विशेष म्हणजे पार्सलची सुविधाही देण्यात येणार आहे.
दरम्यान, कॅन्टींनवरील इतर पदार्थ व जेवणाचे दर काय असणार, याबाबत सध्या माहिती नसल्याचे रेल्वेच्या सुत्रांनी सांगितले.
यापूर्वीची कॅन्टींन वर्षभरातच बंद :
जळगाव रेल्वे स्टेशनवर दोन वर्षापूर्वी आयआरटीसीतर्फे फ्लॅटफार्म क्रमांक तीनवरच एक कॅन्टीन उभारण्यात आली होती. सुरूवातीला या कॅन्टींनला प्रवाशांचा उत्सफूर्त प्रतिसाद होता. मात्र, महागडे अन्न पदार्थ असल्यामुळे कालांतराने प्रवाशांनी या कॅन्टींनकडे पाठ फिरवली.
प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे, ही कॅन्टीन वर्षभरातच बंद पडली होती. तर आता नवीन कॅन्टींनही याच जागेवर उभारण्यात येत आहे.