वाराणसी एक्सप्रेसमध्ये प्रवाशाचा मोबाईल लांबवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 15:16 IST2021-01-06T15:16:25+5:302021-01-06T15:16:49+5:30
वाराणसी एक्सप्रेसमध्ये प्रवाशाचा मोबाईल लांबवल्याची घटना ४ रोजी रात्री घडली.

वाराणसी एक्सप्रेसमध्ये प्रवाशाचा मोबाईल लांबवला
भुसावळ : रेल्वेत मोबाईल, पर्स चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. पुणे-वाराणसी एक्सप्रेसमध्ये ४ रोजी झोपेची संधी साधत चोरट्याने १२ हजार किमतीचा मोबाईल लांबविला.
राजेशकुमार साल हे वाराणसी एक्सप्रेसने पुणे ते अलाहाबाद असा प्रवास करीत होते. गाडी मनमाडजवळ आली असता राजेशकुमार हे साखरझोपेत असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांचा १२ हजार किमतीचा मोबाईल लांबवला. राजेशकुमार यांनी भुसावळ लोहमार्ग पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो शून्य क्रमांकाने मनमाड लोहमार्ग पोलिसांना वर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोना काळात प्रवाशांना कन्फर्म तिकीट असल्याशिवाय रेल्वेस्थानकात प्रवेश दिला जात नाही. मात्र चोरटे बिनधास्त रेल्वेगाडीतून प्रवाशांचे मोबाईल पर्स लांबवत आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.