जळगाव : जैन धर्मात अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पर्युषण महापर्वाची आराधना मुख्य संयोजक सूर्यप्रकाश सामसुखा आणि सहयोगी उपासक पंकज गुलगुलिया यांच्या उपस्थितीत अणुव्रत भवनच्या प्रांगणात झाली.
आठ दिवसीय कार्यक्रमात खाद्य संयम दिवसावर खाण्यापिण्याचा संयम व कर्म यावर मार्गदर्शन केेले. सामायिक दिवसानिमित्त सामायिकचा अर्थ तसेच वाणी संयम या विषयी माहिती दिली. गणाधिपती पूज्य गुरुदेव श्री तुलसी यांनी मार्गदर्शन केले. जप दिवस, ध्यान दिवस याविषयी माहिती देऊन शेवटच्या दिवशी संवत्सरी महापर्वावर प्रबोधन करण्यात आले. क्षमायाचना दिवशी वर्षभरात कळत-नकळत झालेल्या चुकांसाठी क्षमायाचनाविषयी माहिती दिली.
तेरापंथ सभाध्यक्ष माणकचंद बैद, रितेश छाजेड, नम्रता सेठिया यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन नोरतमल चोरडिया यांनी केले.