पर्युषण पर्व आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरे व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:37 IST2021-09-02T04:37:40+5:302021-09-02T04:37:40+5:30
जळगाव : जैन समाजाचे पर्वाधिराज पर्युषण पर्व जगासाठी कल्याणकारी असून हे पर्व केवळ भारतातच नव्हे तर जगभरात साजरे व्हावे, ...

पर्युषण पर्व आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरे व्हावे
जळगाव : जैन समाजाचे पर्वाधिराज पर्युषण पर्व जगासाठी कल्याणकारी असून हे पर्व केवळ भारतातच नव्हे तर जगभरात साजरे व्हावे, असे विचार श्री १००८ कुंथुनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्राचे विश्वस्त आणि खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धिप्रमुख सतीश वसंतीलाल जैन (कुसुंबा) यांनी व्यक्त केले. या विषयी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांकडेही मागणी करण्यात आली आहे.
पार्श्वनाथ सेवा प्रतिष्ठानच्या पद्मावती युवा मंचच्यावतीने सहविचार चर्चासत्र नुकतेच झाले, त्या वेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, विश्व मैत्री व क्षमा प्रदान करण्याचा सिद्धांत पर्युषण पर्वाने अर्थात दशलक्षण धर्माने जगापुढे ठेवला आहे. अखिल विश्वातील जैन समाजाची परिषद दिल्ली, मुंबई, पुणे, जळगाव, नाशिक आदी ठिकाणी आयोजित करावी व तेथे विद्वान मंडळी, पत्रकारांना आमंत्रित करून पर्युषण पर्वाचे आंतरराष्ट्रीयदृष्ट्या महत्त्व पटवून दिले पाहिजे, असेही मत त्यांनी मांडले.
यंदा ९ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर दरम्यान पर्युषण पर्व साजरा होणार आहे. या पर्युषण पर्वातील दहा दिवसांतील धर्माची लक्षणे उत्तम क्षमा, उत्तम मार्दव, उत्तम आर्जव, उत्तम सत्य, उत्तम शौच, उत्तम संयम, उत्तम तप, उत्तम त्याग, उत्तम अकिंचन्य, उत्तम ब्रह्मचर्य ही दश धर्माची दहा लक्षणे प्रत्येकाने पालन करून आचरणात आणली तर देश शांती, सुख व समृद्धीकडे वाटचाल करेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सतीश जैन यांनी कळविले आहे.
या सहविचार सभेत विश्वस्त महेंद्र जैन, पारस जैन, मयूर जैन ,स्वप्नील जैन, पंकज जैन, अभय जैन, राहुल जैन, रोशन जैन, राजेंद्र जैन, वालचंद जैन, चंद्रकांत जैन, विपुल जैन, नितीन जैन, रमेश जैन, प्रमोद जैन, उल्हास जैन, शीतल जैन, अशोक जैन, महावीर जैन, गौरव जैन, ओम जैन, सम्यक जैन, मोहित जैन आदी उपस्थित होते.