वॉटर कप स्पर्धेत पारोळ्यातून ६३ गावे सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 18:34 IST2019-03-26T18:34:07+5:302019-03-26T18:34:20+5:30
लगबग सुरू

वॉटर कप स्पर्धेत पारोळ्यातून ६३ गावे सहभागी
पारोळा : अभिनेता अमिर खान यांच्या पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत पारोळ्यातून ६३ गावे सहभागी झाली आहेत. या सर्व गावांनी तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण पूर्ण केले.
सर्वच गावांमध्ये स्पर्धेपूर्वी करता येणारे सांडपाण्याचे शोषखड्डे, माती परीक्षण, जल बचत, आगपेटी मुक्त शिवार, वृक्ष लागवड या कामांची लगबग सुरू आहे. अनेक गावात ही कामे पूर्णत्वाकडे आहे.
२७ मार्च रोजी पारोळ्यातील गावांमध्ये बायोडायनामिक कंपोस्ट याकरीता सर्व गावकरी सज्ज झाले आहेत. जागा निवड, साहित्याची जुळवा जुळव याची लगबग सुरू आहे.
८ एप्रिल रोजी स्पर्धेला सुरूवात होणार असून ४५ दिवस ही स्पर्धा असणार आहे.
आगपेटी मुक्त शिवार
आपल्या शेतातील पिकांचे अवशेष आपण जाळून न टाकता त्याचे कंपोस्ट केले तर त्याचे उत्तम खत तयार होते. या खताने जमिनीचा पोत वाढून जलधारण क्षमता कमालीने वाढते, अशी माहिती देण्यात आली.