पारोळ्यात 'तरुणाई'ने स्वच्छतेसह व्यसनमुक्तीची घेतली शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 16:40 IST2020-02-02T16:40:12+5:302020-02-02T16:40:36+5:30
विविध भागात स्वच्छता करण्यात येवून तरूणांनी स्वच्छतेसह व्यसनमुक्तीची शपथ घेतली.

पारोळ्यात 'तरुणाई'ने स्वच्छतेसह व्यसनमुक्तीची घेतली शपथ
पारोळा, जि.जळगाव : येथील मनन बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विविध भागात स्वच्छता करण्यात येवून तरूणांनी स्वच्छतेसह व्यसनमुक्तीची शपथ घेतली.
शहरातील साईबाबा मंदिर, मडक्या मारोती चौक, जुलूमपुरा मंदिरासह बसस्थानक परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विशाल महाजन, सचिव राजेश नागपुरे, उपनगराध्यक्ष प्रकाश वाणी, नगरसेवक तथा आरोग्य सभापती दीपक अनुष्ठान, नगरसेवक तथा गटनेते बापू महाजन, तलाठी जितेंद्र जोगी, खंडू बाविस्कर, प्रभाकर शिंपी, प्रा.विकास सोनवणे, अखिल भारतीय छावा संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सागर भोसले, राष्ट्रवादी आयटी सेलचे गणेश पाटील, तेली समाज नवयुवक मंडळाचे अध्यक्ष राहुल चौधरी, राहुल बडगुजर, गुरुदास महाजन, ऋषिकेश चव्हाण, परेश महाजन, संतोष जोगी, ईश्वर जोगी, किरण नागपुरे, राहुल बारी, योगेश जोगी आदी उपस्थित होते.