पारोळा : सोलापूर येथून गुन्ह्याचा तपास करून परत येत असलेल्या पारोळा पोलिसांच्या कारला औरंगाबाद-जालना रस्त्यावर दोनगाव जवळ समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पारोळा येथील हवालदार राजेंद्र पाटील (४८, रा.महाबळ कॉलनी, जळगाव) हे जागीच ठार झाले. तर इतर दोन पोलीस कर्मचारी व एक आरोपी जखमी झाला. ही घटना ९ रोजी पहाटे १ वाजता घडली.पारोळा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांच्या तपाससाठी पारोळा पोलीस कर्मचारी राजेंद्र पाटील, सुधीर चौधरी व महिला पोलीस स्मिता भालडे हे कार (क्रमांक एमएच-४५-ए-९९०९) ने गेले होते. अपघातानंतर दोन तास उपचार न मिळाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर मागे बसलेले हवालदार सुधीर चौधरी, महिला कर्मचारी स्मिता भालडे व आरोपी पूजा चव्हाण यांनाही जबर मार लागला आहे. त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत.
पारोळा पोलिसाचा औरंगाबादजवळ कार अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 17:13 IST
सोलापूर येथून गुन्ह्याचा तपास करून परत येत असलेल्या पारोळा पोलिसांच्या कारला औरंगाबाद-जालना रस्त्यावर दोनगाव जवळ समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पारोळा येथील हवालदार राजेंद्र पाटील (४८, रा.महाबळ कॉलनी, जळगाव) हे जागीच ठार झाले.
पारोळा पोलिसाचा औरंगाबादजवळ कार अपघातात मृत्यू
ठळक मुद्देगुन्ह्याचा तपास करून येत असताना औरंगाबाद जवळची घटनामहिला पोलीस कर्मचारी व आरोपींसह तीन जण जखमीअपघातानंतर दोन तास उपचार न मिळाल्याने झाला मृत्यू