पारोळा : शहरात गोडाऊनला आग, ५० हजारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 22:18 IST2019-09-02T22:18:20+5:302019-09-02T22:18:26+5:30

पारोळा : शहरातील पेढांरपुरा भागातील आशिर्वाद जनरल स्टोअर या दुकानाच्या गोडाऊनला सोमवारी सायंकाळी ५ वाजता शॉर्टसर्किटनेने आग लागली. यात ...

 Parola: Godown fire in the city, damage of 3,000 | पारोळा : शहरात गोडाऊनला आग, ५० हजारांचे नुकसान

पारोळा : शहरात गोडाऊनला आग, ५० हजारांचे नुकसान


पारोळा : शहरातील पेढांरपुरा भागातील आशिर्वाद जनरल स्टोअर या दुकानाच्या गोडाऊनला सोमवारी सायंकाळी ५ वाजता शॉर्टसर्किटनेने आग लागली. यात सुदैवाने जीवित झाली नाही.
गोडाऊनमधील रिकामे पुठ्ठे, फर्निचर व काही वायर बंडल या साहित्यास आग लागून जवळ पास ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग विजविण्याकामी शहरातील संजय क्षत्रिय, अशोक लालवानी, अंकुश मराठे, रवी चौधरी, योगेश हिंदुजा, संतोष हिंदुजा, सुधीर आफ्रे, जितू नंदवाणी, जितू वाणी, किशोर नंदवाणी, अजय राजपूत, मुकेश पाटील यांनी फायर फायटरद्वारे आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळाने नपाचे अग्निशामक बंब दाखल झाले. यावेळी नगराध्यक्ष करण पवार, नगरसेवक दिपक अनुष्ठान, पी.जी.पाटील, कैलास पाटील आदींनी घटनेबद्दल विचारपूस केली. पारोळा येथे

Web Title:  Parola: Godown fire in the city, damage of 3,000