पालकांनो पोरींना सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:12 IST2021-07-03T04:12:30+5:302021-07-03T04:12:30+5:30

जामनेर : पालकांनो पोरींना सांभाळा, असे कळकळीचे आवाहन करण्याची वेळ येथील पोलिसांवर आली आहे. याला कारणही तसेच घडले आहे. ...

Parents take care of the kids | पालकांनो पोरींना सांभाळा

पालकांनो पोरींना सांभाळा

जामनेर : पालकांनो पोरींना सांभाळा, असे कळकळीचे आवाहन करण्याची वेळ येथील पोलिसांवर आली आहे. याला कारणही तसेच घडले आहे. त्याचे झाले असे की, या आठवड्यात तालुक्यातील दहा तरुणांनी त्यांच्या प्रेयसींशी लग्न करून पोलीस ठाणे गाठले व सुरक्षा देण्याची मागणी केली.

शुक्रवारी तीन जोडपी पोलिसांसमोर हजर झाली. त्यातील मुली या नाशिक, दमण व एक जामनेर जवळच्या खेड्यातील आहे. कायदा, सुव्यवस्था सांभाळावी की लैला मजनूंचे लग्न लावावे, असा प्रश्न पोलीस विचारत आहेत.

गेल्या काही महिन्यात मुले व मुली घरून पळून जाऊन पालकांच्या संमतीविना लग्न करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष देणे गरजेचे आहे.

- प्रताप इंगळे, पोलीस निरीक्षक, जामनेर

Web Title: Parents take care of the kids