कोरोनाच्या या काळात ऑनलाइन शिक्षण, विद्यार्थी आणि पालकांच्या समस्या व त्यावरील उपाययोजना, सेतू अभ्यासक्रम आढावा, स्वाध्याय उपक्रम आदी विषयांवर चर्चा होऊन विद्यार्थ्यांचा गुणवत्तावाढीसाठी विविध ठराव मंजूर करण्यात आले. पालकसभेच्या अध्यक्षस्थानी पालक प्रतिनिधी उमाकांत खेवलकर होते. याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक चंद्रशेखर चौधरी यांनी संपूर्ण कोरोना काळातील कार्यवाहीचा आढावा सादर केला. योगेश चौधरी यांनी ऑनलाइन शिक्षण समस्या व उपाय यावर मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य कसे सुदृढ राहील याबाबतीत पालकांना आवाहन केले. पंकज महाविद्यालयाचे मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक डाॅ. आशिष जाधव यांनी बालमानसशास्त्रातील संबोध स्पष्ट करून मुलांच्या वर्तनातील बदलांबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन मयूर पाटील व आभार प्रदर्शन स्वप्निल ठाकूर यांनी केले. यशस्वितेसाठी प्रफुल्ल महाजन, सचिन लोखंडे, धनश्री जावळे, नितीन वाल्हे, दिलीप बाविस्कर, संदीप पाटील, रवींद्र शार्दूल, कैलास बोरसे, प्रमोद पाटील आदींनी परिश्रम घेतले.
130921\1642-img-20210913-wa0031.jpg
??? ?? ???? ?????? ???? ??????? ????