शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीतील गुन्हेगारांची ओळख परेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : शहरातील चोरी घरफोडी सत्रातील गुन्हेगारी वृत्तीचा बिमोड करण्यासाठी संभाव्य घरफोडी, चोरी यासारख्या गुन्ह्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ : शहरातील चोरी घरफोडी सत्रातील गुन्हेगारी वृत्तीचा बिमोड करण्यासाठी संभाव्य घरफोडी, चोरी यासारख्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनातून ३ रोजी भुसावळ उपविभागातील पोलीस स्टेशन्सला यापूर्वी घरफोडीचे गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपींची अर्थात रेकॉर्डवरील आरोपींची ओळख परेड व कसून चौकशी दुपारी १२:३० ते २:३० अडीचच्या दरम्यान घेण्यात आली.

ओळख परेडमध्ये उपविभागातील भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील ७ आरोपी, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील ७ आरोपी व भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील ७ आरोपी याप्रमाणे एकूण २१ रेकॉर्डवरील आरोपी बोलावण्यात आले होते. ओळख परेड दरम्यान त्यांना सविस्तर विचारपूस करण्यात आली. त्याशिवाय सद्य:स्थितीत हे आरोपी काय करतात? कोणते वाहन वापरतात? कोणता मोबाइल वापरतात? आदी बाबींची सविस्तर माहिती नोंदविण्यात आली तसेच त्यांचे इंटरोगेशन फॉर्म भरून घेण्यात आले.

त्यांना चांगल्या वर्तनाची समज देण्यात आली. याशिवाय त्यांच्यावर सीआरपीसी ११० खाली प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव तयार करण्यात आहेत.

ही ओळख परेड पोलीस निरीक्षक भागवत बाजारपेठ पोलीस स्टेशन, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे पोलीस निरीक्षक कुंभार, तिन्ही पोलीस स्टेशन यांच्या गुन्हे शाखेतील अंमलदारांनी केली.