विहीरीला पाणी लागल्याने तीनशे जणांची पंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 21:29 IST2020-05-25T21:04:15+5:302020-05-25T21:29:15+5:30

्र्रजामनेर : प्रकार झाला व्हायरल

Pangat of three hundred people due to water in the well? | विहीरीला पाणी लागल्याने तीनशे जणांची पंगत

विहीरीला पाणी लागल्याने तीनशे जणांची पंगत


जामनेर : शेतात नुकत्याच खोदलेल्या विहीरीला पाणी लागल्याचा आनंद साजरा करण्यासाठी जामनेर जवळ कोदोली रस्त्यावर सुमारे तीनशे लोकांच्या जेवणाचा बेत झाल्याची चर्चा सोमवारी दिवसभर सोशल मिडीयावर होती.
विहीरीला पाणी लागल्याचा आनंद साजरा करणे अयोग्य नसले तरी सध्या सुरु असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर शासनाने लावलेले निर्बंध पाहता अशी पंगत देणे नियमबाह्यच आहे. मात्र झालेला आग्रह टाळता न आल्याने पंगतीचा बेत झालाच व यात राजकीय, सामाजीक कार्यकर्त्यांसह काही शासकीय कर्मचारी सहभागी झाल्याच्या चचेर्ला उधाण आले.
 

Web Title: Pangat of three hundred people due to water in the well?