धरणगाव येथे पंचकल्याणक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 09:15 PM2018-12-25T21:15:52+5:302018-12-25T21:17:13+5:30

चांगले पीक यावे म्हणून शेतकरी शेतात बिजारोपण करण्यापूर्वी शेतीची मशागत करुन भूूमीवर संस्कार करतो. त्याचप्रमाणे नवा जीव जन्माला घालण्यापूर्वी गर्भावर संस्कार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुनींश्री अक्षयसागरजी जी महाराज यांनी व्यक्त केले.

Panchkalyanak Mahotsav at Dharangaon | धरणगाव येथे पंचकल्याणक महोत्सव

धरणगाव येथे पंचकल्याणक महोत्सव

googlenewsNext
ठळक मुद्देगर्भसंस्कारांनी अंतिम निर्वाण सुकर होते : मुनिश्री अक्षयसागरजी महाराजपंचकल्याणक महोत्सवात गर्भकल्याणक पूर्वार्ध महोत्सवभाविकांची मोठी उपस्थिती

धरणगाव, जि.जळगाव : चांगले पीक यावे म्हणून शेतकरी शेतात बिजारोपण करण्यापूर्वी शेतीची मशागत करुन भूूमीवर संस्कार करतो. त्याचप्रमाणे नवा जीव जन्माला घालण्यापूर्वी गर्भावर संस्कार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुनींश्री अक्षयसागरजी जी महाराज यांनी व्यक्त केले. श्री १००८ आदिनाथ दिगंबर पंचकल्याणक महोत्सवाच्या गर्भकल्याणक पूर्वार्धात ते बोलत होते. गर्भसंस्कार चांगले असतील तर अंतीम निर्वाण सुकर होते, असे ते म्हणाले.
संस्कार म्हणजे परीशोधन आहे. ज्याप्रमाणे एखाद्या पात्राचा उपयोग करण्यापूर्वी त्यास विसळणे, स्वच्छ करणे आवश्यक असते, तसेच जीव जन्माला येण्यापूर्वी गर्भसंस्कार आवश्यक असतात, असे ते म्हणाले. यापूर्वी मुनींश्री समताभूषणजी महाराज यांनी प्रबोधन केले. जीवनातील पुण्यकमार्चे महत्त्व विशद केले. आधुनिकतेच्या मागे लागल्याने नव्या पिढीत भक्ती आणि श्रध्देला ओहटी लागली आहे, असे म्हणत त्यांनी चिंता व्यक्त केली. पुण्यधर्मफल जास्त असेल तर महातीर्थकरांचीही प्राप्ती होते. आवश्यकतेपेक्षा जास्त धनाची प्राप्ती करु नका, कारण ते पापकर्म केल्याशिवाय येत नाही, जे व्यक्तीच्या पतनाला कारणीभूत ठरते, असा इशारा त्यांनी उपस्थितांना दिला.
मंगळवारी प्रात:काळी नित्यपूजा, अभिषेक व शांतीधारा, इंद्रप्रतिष्ठा सकलीकरण झाले. त्यानंतर मुनींश्रींचे प्रवचन होऊन इंद्रप्रतिष्ठा, याग मंडळ विधान, मंगल कलशाची स्थापना करण्यात आली.
दुपारच्या सत्रात जशी करणी तसे फळ ही नाटिका सादर करण्यात आली. गर्भसंस्कारावर मुनींश्रींचे प्रवचन झाले. सायंकाळी संगीतमय आरती, शास्त्र प्रवचन होऊन रात्री सौधर्म इंद्र सभा, तत्व चर्चा, इंद्रासन कंपायमान, अयोध्येची रचना, अष्टकुमारीद्वारा मातेची सेवा, सोळा स्वप्नदर्शन, गर्भकल्याणक आंतरिक क्रिया आदी कार्यक्रम झाले. सूत्रसंचालन मोहन जैन यांनी केले.

Web Title: Panchkalyanak Mahotsav at Dharangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.