शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

रावेर पोलीस स्टेशनला लाभले ‘ळे’ व ‘डे’च्या आडनावात यमक साधणारे पाचवे पोलीस निरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 6:33 PM

राज्यभरातील अतिसंवेदनशील पाच शहरात समावेश होणाऱ्या रावेर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदावर ‘डे’ व ‘ळे’ या साधर्म्य असलेल्या यमक आडनावात साधणारे सतत पाचवे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या रूपाने लाभले आहे.

ठळक मुद्देकार्यकर्तृत्वाचा काही ना काही गुण अंगीकारण्याचा प्रयत्न करणारे पोलीस निरीक्षक या पोलीस ठाण्यात लाभले. आकडे यांनी लागोपाठ झालेल्या दोन्ही जातीय दंगलीतील समाजकंटकांच्या नांग्या ठेचून काढल्या होत्या.कुराडे यांनी पोलीस व जनता यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला.पिंगळे यांनी लोकाभिमुख प्रशासन राबवून पोलीस ठाण्याला कापोर्रेट लूक मिळवून दिला.

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : राज्यभरातील अतिसंवेदनशील पाच शहरात समावेश होणाऱ्या रावेर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदावर ‘डे’ व ‘ळे’ या साधर्म्य असलेल्या यमक आडनावात साधणारे सतत पाचवे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या रूपाने लाभले आहे.रावेर पोलीस ठाण्यात पोलीस विभागाला ज्यांनी जणू काही आपले सर्वस्वी खर्ची घातलेले आयुष्य समर्पित करून सेवानिवृत्तीनंतर देहावसान झालेले दिवंगत पोलीस निरीक्षक वाय.डी.पाटील यांच्या बदलीनंतर त्यांच्या शिस्तबद्ध प्रशासनाच्या पावलावर पाऊल ठेवणारे कोणी पोलीस निरीक्षक या संवेदनशील शहरासह पोलीस ठाण्यात लाभतील किंवा नाही, असा जनसामान्यांच्या मनात रूंजी घालणारा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता.मात्र ‘होतील बहू, आहेत बहू पर तुज सम तुच आहेस’ या उक्तीप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल अद्याप कुणी ठेवले नसले तरी त्यांची सेवा मात्र येणाºया पोलीस निरीक्षकांना काहीतरी स्फूर्ती नक्कीच देवून जाते. आरोपी व फिर्यादी यांच्यात त्यांच्यासमक्ष काही तडजोड होत असेल तर ठीक. अन्यथा संशयित आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची त्यांची हातोटी होती किंबहुना फिर्यादीविरुद्ध मुद्दाम आरोपीची खोटी क्रॉस कम्प्लेंट नोंदवून घेण्यास त्यांचा सक्त विरोध राहत असे. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक राखण्यात व समाजमनात आदरयुक्त जरब त्यांनी प्रस्थापित केली होती. त्यातही कोणताही लोकप्रतिनिधी, समाजपंच, वा पुढारी मध्यस्थ वा दलाल म्हणून उपस्थित होणे त्यांना नापसंत ठरत होते.या त्यांच्या कार्यपद्धतीचा अवलंब कोणी पोलीस निरीक्षक करू शकले नसले तरी, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा काही ना काही गुण अंगीकारण्याचा प्रयत्न करणारे पोलीस निरीक्षक या पोलीस ठाण्यात लाभले. योगायोगाने त्यांच्या पाठोपाठ आलेले पाचही पोलीस निरीक्षकांच्या आडनावात ‘डे व ळे’ या साधर्म्य उच्चाराचा यमक साधणारे पोलीस निरीक्षक लाभले. दिवंगत पोलीस निरीक्षक वाय.डी.पाटील यांच्या बदलीनंतर अनिल आकडे यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांनी शहरातील लागोपाठ झालेल्या दोन्ही जातीय दंगलीतील समाजकंटकांच्या नांग्या ठेचून काढल्या होत्या. तद्नंतर सुनील कुराडे यांनी पोलीस निरीक्षक पदाचा पदभार सांभाळला होता. त्यांनी पोलीस व जनता यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला. तद्नंतर, काळे यांनी पदभार स्वीकारला. त्यांनी समाज उपद्रवी मूल्यांवर अंकूश निर्माण केला. तद्नंतर पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी पोलीस प्रशासनात कुणाचाही हस्तक्षेप सहन न करता लोकाभिमुख प्रशासन राबवून पोलीस ठाण्याला कापोर्रेट लूक मिळवून दिला. आता पोलीस निरीक्षक पदाची धुरा रामदास वाकोडे यांनी सांभाळली असून, वरकरणी गुंड प्रवृत्तीला ठेचून काढण्याचा त्यांचा बाणा दिसत आहे. त्यांचा हा बाणा व प्रशासनातल शिस्त कितपत सातत्यपूर्ण टिकतो? हा येणारा काळच ठरवणार असून, आकडे, कुराडे, काळे, पिंगळे यांच्या कार्यपद्धतीतील अनुुशेष निरीक्षक रामदास वाकोडे हे कशाप्रकारे भरून काढतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेRaverरावेर