शहरं
Join us  
Trending Stories
1
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
2
फोनमध्ये सिम नसल्यास अॅप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सअॅप वेब थेट लॉगआउट होणार!
3
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
4
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
5
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
6
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
7
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
8
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
9
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
10
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
11
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
12
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
13
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
14
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
15
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
16
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
17
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
18
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
19
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
20
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात गळक्या खोल्यांमध्ये चित्रकला स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 17:02 IST

भुसावळ : शासकीय चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्याथ्र्याना चक्क गळक्या शाळा खोलीत परीक्षा द्यावी लागली.त्यामुळे त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

ठळक मुद्दे तालुक्यातील 27 शाळांमधील सुमारे 500 विद्यार्थी सहभागी म्युनिसिपल हायस्कूलमधील या प्रकाराने पालकांमध्ये संतापअनेक खोल्यांमध्ये मुलांना खाली जमिनवीर बसून द्यावी लागली चित्रकला परीक्षा

ऑनलाईन लोकमतभुसावळ : शासकीय चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्याथ्र्याना  चक्क गळक्या शाळा खोलीत परीक्षा द्यावी लागली.त्यामुळे त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. शहरातील न.पा.मालकीच्या म्युनिसिपल हायस्कूलमधील या प्रकाराने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.गुरुवारी  एलीमेंटरी आणि इंटर मीजिएट शासकीय चित्रकला स्पर्धा  झाली. स्पर्धेत तालुक्यातील 27 शाळांमधील सुमारे 500 इतके विद्यार्थी सहभागी झाले होते. ही परीक्षा पालिकेच्या म्युनिसिपल हायस्कूलमध्ये झाली. मात्र पावसामुळे संपूर्ण शाळेतील वर्ग खोल्यांना गळती लागल्याने परीक्षार्थीची प्रचंड गैरसोय झाली.शाळेच्या वर्ग खोल्यांचे कौल तुटलेले असल्याने सर्वच वर्गखोल्यांमध्ये पाणी गळत होते. यात भरीसभर म्हणून की काय बाकांची संख्यादेखील कमीच होती. त्यामुळे अनेक खोल्यांमध्ये मुलांना खाली जमिनवीर बसून  चित्रकला परीक्षा द्यावी लागली. काही खोल्यांमध्ये एकाच बाकांवर दोन-दोन विद्याथ्र्याना बसविण्यात आले होते.परीक्षेची वेळ सकाळी 10.30 वाजेची होती. वरच्या मजल्यावरील सर्व खोल्यांवरील कौल फुटलेली होती. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाला सफाई व बाक व्यवस्थित लावण्यात बराच वेळ गेला. त्यामुळे परीक्षा उशीराने सुरू झाली.  चित्र काढण्यासाठी पुरेसा वेळ देऊ  असे प्रभारी मुख्याध्यापक  बी.यू.सोनवणे यांनी पालकांना सांगून त्यांची समजूत काढली.

परीक्षेत अहिल्यादेवी कन्या विद्यालय, बी.ङोड.उर्दू हायस्कूल, बियाणी मिलटरी स्कूल, बियाणी इंग्रजी, मराठी शाळा, डी.एल.हिंदी विद्यालय, सुनसगाव येथील दामू पांडू पाटील विद्यालय, साकेगावचे इंदिरा गांधी विद्यालय, खडके येथील ज्ञानज्योती विद्यालय, साकरीचे जनता हायस्कूल, म्युनिसिपल हायस्कूल, महाराणा प्रताप विद्यालय, पुं.ग.ब:हाटे विद्यालय, वराडसीम येथील पं.नेहरू विद्यालय, कु:हे येथील रा.धो.विद्यालय, संत गाडगेबाबा हिंदी विद्यालय, किन्हीचे सवरेदय हायस्कूल, ताप्ती पब्लीक स्कूल, डॉ.उल्हास पाटील, अलहिरा उर्दू हायस्कूल, एन.के.नारखेडे, वल्र्ड स्कूल, बुद्धीस्ट इंटर नॅशनल, एमआय  तेली, अलहिरा प्रायमरी,पोदार इंटर नॅशनल या शाळांमधील विद्याथ्र्याचा सहभाग होता.

म्युनिसिपल हायस्कूलमधील शाळा खोल्या गळत आहेत हे कळविले होते. ही परीक्षा या शाळेत लादण्यात आली.- बी.वाय.सोनवणे, मुख्याध्यापक, म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ.